हातिवले येथील टोल नाका फक्त सुशोभीकरणासाठी उभारण्यात आला आहे का? टोल बंद ठेवून सरकार आपले नुकसान का करून घेत आहे?
राजापूर तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातिवले येथे टोल नाका उभारण्यात आला आहे. मात्र हा टोल अद्याप चालू नाही. टोल बंद ठेवून सरकार आपले आर्थिक नुकसान का सहन करत आहे असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाच्या वेळी हातीवले गावामध्ये टोल उभारणी करण्यात आली होती. मात्र काही काळ लोटला तरी महामार्गाचे काम पूर्ण होत नव्हते. त्यामुळे महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल बंद ठेवण्यात यावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. मात्र आता मुंबई गोवा महामार्ग चौपदरी करण्याचे काम राजापूर ते लांजापर्यंत पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे राजापूर ते सिंधुदुर्ग जिल्हा पर्यंत चौपदरीकरण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र तरीसुद्धा टोल अद्याप बंद ठेवण्यात आलेला आहे.
टोल मधून कर जमा झाला तर महामार्गाच्या मेंटेनन्स साठी, डागडुजी साठी तो निधी वापरता येऊ शकतो. ज्या ठिकाणी महामार्गाचे काम झाले आहे त्या ठिकाणी महामार्गाला तडे गेले आहेत. अशी काही कामे असतील तर टोल मधून मिळालेल्या कराचा / निधीचा विनियोग होऊ शकतो. परंतु राज्यातील भाजप - शिवसेना सरकार हातिवले टोल चालू का करत नाहीये. महायुती सरकार आपले आर्थिक नुकसान का सहन करत आहे? आणि सरकारला जर टोल वसुली करायचीच नसेल तर हातिवले गावात हायवे वर टोल स्टेशन का उभारले आहे? त्या ठिकाणी काही वेळेला मोकाट गुरे सुद्धा बसलेली असतात. असे सवाल उपस्थित केला जात आहे.
Comments
Post a Comment