रत्नागिरी शहरात रस्त्यावर धुरळा, लोकांना मनस्ताप, रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत भाकरी परतली जाणार!, महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा अनेक नारिकांचा निर्धार!

रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या सुरू झालेल्या डांबरीकरणाच्या कामामुळे धुरळा निर्माण झाला असून त्यामुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अक्षरशः डोळे चोळत गाडी चालवावी लागत आहे. तर धुळीमुळे कपडे सुद्धा खराब होत आहेत. तसेच रस्त्यावर रेवा असल्यामुळे गाड्या स्लिप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरात अब की बार परिवर्तन निश्चित आहे कारण लोकांना वर्षभरातून या ना त्या कारणाने धुरळा खायला मिळतोच आहे. लोकांना मनस्ताप देणाऱ्यांची सत्ता नगर परिषदेवर हवीच कशाला असा निर्धार अनेक नागरिकांनी केला असून यावेळेस महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्धार नागरिकांनी घेतला असल्याचे बोलले जात आहे.

Comments