जिल्ह्यातील सर्व नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे कशा देता येतील, -डॉ. आडकेकर


जिल्हा परिषद येथे आरोग्य विषयक आढावा व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

रत्नागिरी येथे सार्वजनिक आरोग्य सेवेची गुणवत्ता अधिक प्रभावी व सर्वसामान्य जनतेपर्यंत सुलभपणे पोहोचविण्यासाठी आढावा व मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा सार्वजनिक आरोग्य विभागाचे- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. आडकेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सखोल मार्गदर्शनाखाली  लोकनेते शामराव पेजे सभागृह, रत्नागिरी येथे पार पडली.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे कशा देता येतील, यासाठी डॉ. आडकेकर यांनी महत्वाच्या विविध आरोग्य विषयक बाबींचे संगणकीय सादरीकरण करत प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले. उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर, सेवा वितरणातील पारदर्शकता, रुग्णकेंद्री सेवा पद्धती आणि आरोग्य यंत्रणेमधील समन्वय, उत्कृष्ठ सनियंत्रण व पर्यवेक्षण यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली.

या कार्यशाळेस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव, तसेच प्र.जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. परवेज पटेल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यशाळेस रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सर्व एनएचएम आरोग्य कार्यक्रम समन्वयक , सर्व जिल्हास्तरीय पर्यवेक्षक आणि तालुका समूह संघटक,आशा गट प्रवर्तक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी जिल्ह्यातील नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि प्रभावी आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

— जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद रत्नागिरी
https://chat.whatsapp.com/BCfl8N9gnpl1Ah6yk6IXkD?mode=hqrt2


https://www.news.mangocity.org/2025/11/blog-post_245.html




🟣 सौ. प्राजक्ता प्रविण किणे — “जनता मालक” चळवळीची खरी उमेदवार
रत्नागिरीत निवडणुका आल्या की मोठमोठे पोस्टर्स, फोटोसेशन, लाखोचा खर्च, भाषणं… पण जनतेला पाच वर्षे फाट्यावर मारणाऱ्यांना मतदान देण्याची वेळ का येते?

कारण — जनतेला पर्याय दाखवला जात नाही.
आणि म्हणूनच सौ. प्राजक्ता प्रविण किणे या निवडणुकीत परिस्थिती बदलायला उभ्या आहेत.

त्या “पक्षांच्या” उमेदवार नाहीत.
त्या जनतेच्या मनातून आलेल्या उमेदवार आहेत.
त्या “जनता मालक” या भूमिकेवर ठाम उभ्या आहेत.

📌 का घाबरले आहेत पारंपरिक पक्ष?
ज्या पद्धतीने मोठमोठ्या पक्षांचे उमेदवार लाखो-करोडो खर्चून निवडणुका लढवतात,
त्याच पद्धतीने प्राजक्ता किणे यांच्या नावाची एक साधी बातमीही काही माध्यमे छापायला तयार नाहीत.

✔ कारण त्या “त्यांच्या राजकारणातल्या” नाहीत
✔ कारण त्या बोलतात ठोस मुद्दे
✔ कारण त्यांचा जाहीरनामा म्हणजे फक्त वायदे नाहीत — उपाय आहेत
✔ कारण भ्रष्ट व्यवस्थेची घाबरलेली माणसं जाणतात – जनता जागली तर त्यांचं साम्राज्य कोसळणार!

परवा तारांगणात झालेल्या कार्यक्रमाला सुद्धा आमंत्रण न देणे हे याचाच पुरावा आहे.

📖 जाहीरनाम्याचा गाभा – शिक्षण आणि आरोग्य
मतदारसंघातील सर्व जाहीरनामे वाचा.
प्रत्येकात “हे करु, ते करु” अशीच गोडगोड भाषा.

परंतु प्राजक्ता किणे यांचा जाहीरनामा मात्र वेगळा आहे:

🎓 ५० कोटीत रत्नागिरीला मोफत शिक्षण योजना
जिथे इतर पक्ष 500 कोटी उधळायला तयार,
तिथे प्राजक्ता किणे यांनी पोद्दार / SVM सारख्या शाळांमध्ये
रत्नागिरीच्या मुलांना मोफत दर्जेदार शिक्षण देण्याची व्यवहार्य योजना तयार केली आहे.

🏥 सर्वांसाठी मोफत/कमी दरात आरोग्य
परकार, चिंतामणी, लोटलीकर अशा हॉस्पिटलमध्ये जेथे
डांबरा वर पैसा उधळला जातो, तिथे
“उपचार मिळत नाही पण बिल मिळते” अशी परिस्थिती लोकांनी भोगली.

प्राजक्ता किणे यांनी सर्व वयोगटातील मतदारांसाठी
खास आरोग्य योजना आणण्याची हमी दिली आहे.
गरीब-श्रीमंत असा भेद नाही, कारण
श्रीमंतांचेही हप्ते थकलेले असू शकतात.

⚠ लोकांतला साधा प्रश्न
💬 ज्यांना आमदारकी, खासदारकी मिळाली — त्यांनी हे काम केले का?
जर ते करू शकले नाहीत तर त्यांचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष करतील का?

हा साधा, प्रामाणिक आणि बोचरा प्रश्न आहे.

🔵 “जी मालक – तीच पुढे येणार”
Ratnagiri — WE THE PEOPLE!
Ratnagiri — WITH THE PEOPLE!

प्राजक्ता म्हणतात:

“आम्ही जनतेचे प्रतिनिधी नाही,
जनतेचे नेतृत्व करायला आलो आहोत.
जनता मालक — आम्ही सेवक!”

जनतेलाच जाहीरनामा तयार करण्यात सामील करून
पहिल्यांदाच जनता-आधारित निवडणूक घडवून आणली जाते आहे.

🟠 राष्ट्रवादीची, आप चा उमेदवार व फुट — पूर्वनियोजित?
निवडणुकीच्या आदल्या रात्री
रात्री १२ वाजता अचानक गटबदल…
फक्त मुस्लिम बहुल भागातच प्रचार…
बाकी शहरात पाऊलही नाही…

यावर प्रश्न विचारणे स्वाभाविक:

मुस्लिम मतांचे तुकडे करण्याचा प्लॅन?
कुणाचा विजय “सोप्पा” करण्यासाठी हा सगळा उपद्व्याप?
आर्थिक व्यवहाराचा संशय का निर्माण होतो आहे?
मुस्लिम समाजाला 5 वर्षे न भेटणारे “एकाच रात्री नेता” बनतात कसे?
मुस्लिम समाजानेही यावेळी या खेळी ओळखली पाहिजे.

🟣 योग्य पर्याय – शिवानी राजेश सावंत (उद्धव ठाकरे गट) शिल्पा सुर्वे शिंदे गट हे दोन्ही असू शकत नाहीत.. 25 वर्षात यांना आपण खूप संधी दिली...नाही… योग्य पर्याय कोण?
होय, काही प्रभागात नगरसेवक म्हणून त्यांची निवड योग्य असू शकते.

पण नगराध्यक्षपदासाठी
जनता स्पष्ट सांगत आहे:

"सामान्य जनतेतून आलेली —
प्राजक्ता प्रवीण किणेच योग्य पर्याय आहे."

💜 महिला नेतृत्व — आता सज्ज!
आपण नेहमी म्हणतो:

“राजकारणात महिलांनी यायला हवे!”

मग जेव्हा
तुमच्या स्वतःच्या घरातील, समाजातील, परिसरातील
एक शिक्षित, प्रामाणिक, अभ्यासू महिला
निवडणुकीला उभी राहते…

तेव्हा आपणच तिची साथ सोडणार?

🔴 मीडिया, पत्रकार बांधवांसाठी विनंती
प्राजक्ता किणे ही तुमचीच बहीण आहे.

नामनिर्देशन भरलेल्या उमेदवाराचे नावही
काही माध्यमांनी छापले नाही…

इतिहास लिहिला जाईल तेव्हा
हीच गोष्ट तुमच्याविरुद्ध उभी राहील.

💥 रत्नागिरीमध्ये वैचारिक क्रांती सुरू आहे
या निवडणुकीत पैसा नाही,
पोस्टर्स नाहीत,
जबरदस्ती नाही…

फक्त जनता — आणि जनतेचा जाहीरनामा!

रत्नागिरीतील मतदारच विचारत आहेत:

“प्राजक्ता मोफत शिक्षण देऊ शकते —
तर तुम्ही का नाही देऊ शकत?”

“प्राजक्ता आरोग्य योजना देऊ शकते —
तर तुम्ही का नाही देऊ शकत?”

मतदारच प्रचार करत आहेत.
जनताच लढत आहे.
हाच या निवडणुकीचा सर्वात मोठा चमत्कार.

🔵 शेवटची हाक — निर्भय होऊन पुढे या
खूप झाले भैय्या… साहेब… भाई…
खूप झालं जुनं, गलिच्छ, गटार राजकारण.

आता रत्नागिरी सांगते —

“जनता मालक — आणि मालकांचीच मुलगी नगराध्यक्ष!”

✔ नंबर 1 चे बटन —
✔ नंबर 1 उमेदवार —
✔ नंबर 1 यश

सौ. प्राजक्ता प्रविण किणे

“सीसीटीव्ही नंबर 1 बटण दाबा.
आपल्या मुलीचा विजय करा.
कारण मीडिया नाही —
या वेळी जनताच प्रचारक आहे!”**


विचारा हे 
प्रस्थापित लोक हे रत्नागिरी करांना देणार का?

मी देणार कारण मी कोणत्याही खर्च नाही करणार मी कुठेही पैसे नाही वाटणार आणि जे आता तुमच्यासोबत घडणार तेच भविष्य तुम्हाला मिळणार त्यामुळे भविष्य बदला आणि उमेदवार प्राजक्ताला द्या.

https://youtu.be/VvaMKehJuOM?si=25Y74CKHH_amn0Jw

मी प्राजक्ता प्रवीण किणे —
नगराध्यक्ष पदासाठी उभी असलेली तुमची स्वताची मुलगी,
जनता मालक म्हणजे तुम्ही हाच माझा पक्ष. तुम्हीच प्रचारक , 

रत्नागिरी शहराची सुमारे एक लाख लोकसंख्या… पण पाचशे कोटी रुपये खर्च होऊनही आजपर्यंत काहीच बदल झाला नाही.
👉 कारण समस्या पैशाची नाही… व्हिजनची, नियोजनाची, आणि प्रामाणिक प्रशासनाची आहे.
आम्ही घर काटकसरीने चालवतो .. नगरपालिका तर जिवापाड सांभाळू 

मी वचन देते — केवळ आहे त्या, पन्नास कोटींत शहराला खऱ्या अर्थाने बदल घडवून दाखवीन:

शिक्षण

खाजगी शाळांमध्ये मोफत शिक्षण

शिक्षकांना फक्त शिकवण्याचेच काम — कोणतीही गैर-शैक्षणिक कामे देणार नाही

आरोग्य

खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार

उद्योजकता व रोजगार

प्रत्येक तरुणाला फक्त पाच हजार रुपयामध्ये गाळा

भाजीवाले, फेरीवाले, छोटे व्यापारी — शहरात कुठेही व्यवस्थित व्यवसाय करू शकतील अशा मोफत सुविधा

वाहतूक व व्यवस्था

रस्ता खराब झाला तर रिक्शा/गाडीधारकांसाठी मेंटेनन्स मदत समोर थांबून कामे करून घेणार 

प्रशासन

कर्मचारी, पोलीस यांना प्रचार किंवा राजकीय दबाव झेलावा लागणार नाही

प्रशासन पूर्णपणे न्याय्य, पारदर्शक व जनतेच्या बाजूने

आजवर तुम्ही ज्यांना मत दिले, त्यांनी तुम्हाला तेच दिले जे नेहमी मिळत आले.
या वेळी बदल हवा असेल, तर तुमच्या स्वतःच्या मुलीला — प्राजक्ता ताईला — संधी द्या.

मी तुमच्यातीलच एक —
रस्त्यांना, भ्रष्ट खर्चाला, राजकीय खेळाला त्रासलेली गृहिणी, आई, आणि रत्नागिरीकरांची रत्नकन्या.

मतदान चिन्ह : सीसीटीव्ही 📹
मशीनवर नंबर एक, माणूस नंबर एक —कामातही नेक लक्ष ठेवण्यासाठी चिन्ह — सीसीटीव्ही

तुम्हीच माझे माय, बाप, भाऊ, बहिणी…
आता तुमच्यामधील मुलीला नगराध्यक्ष पदी बसवण्याची वेळ तुमच्या हातात आहे.

मी वचन देते — वचन पाळणारच.

तुमची रत्नकन्या,
प्राजक्ता ताई किणे
8329264505

prajkta.mangocity.org

Comments