रत्नागिरीत काँग्रेसच्या जागांवर राष्ट्रवादीचा क्लेम?, प्रत्येक वेळी काँग्रेसला अडचणीत आणण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाचा प्रयत्न! यांच्या पाठीमागे नेमके कुणाचे अदृश्य हात? राजकीय वर्तुळात चर्चा

रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. अशातच काँग्रेस पक्ष ज्या ठिकाणी उमेदवारी मागत आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या एका गटाकडून क्लेम केला जात आहे. काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रयत्न होत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष अशी महाविकास आघाडी व्हावी अशी अनेकांची इच्छा असून देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका गटाकडून स्वतंत्र लढण्याचा सूर ऐकायला मिळत आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस अशी आघाडी होऊ शकते अशा प्रकारची चाचपणी काँग्रेसच्या नेत्यांकडून सुरू असल्याचे देखील बोलले जात आहे. 

रत्नागिरी नगर परिषदेची 16 प्रभागातून 32 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जवळपास निश्चित झाल्याचे समजते आहे. अशातच राज्यामध्ये संपूर्ण महाविकासाकडे असताना देखील रत्नागिरीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे एका गटाकडून आम्ही देखील नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागत आहोत अशी मागणी करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या भूमिकेबद्दल वेगळाच संशय व्यक्त केला जात असून यांच्या पाठीमागे नेमके कोणाचे अदृश्य हात आहेत असाही सवाल उपस्थित केला जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवण्यात आले होत्या. आणि अशा महाविकास आघाडीमध्ये त्या त्या उमेदवारांना चांगले मतदान झाले होते. मात्र रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक जसजशी जाहीर झाली तसतशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सूर बदलण्यास सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक गट महाविकास आघाडी करण्यास तयार आहे तर दुसरा गट स्वतंत्र किंवा मैत्रीपूर्ण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. 

काँग्रेस पक्ष ज्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागत आहे त्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका गटाकडून काँग्रेसच्या जागांवरच उमेदवारी मागण्यात येत असल्याने या गटाच्या पाठीमागे कोणाचे नेमके अदृष्य हात आहेत असा सवाल सध्या राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहे. 

Comments