राजापूर अर्बन बँकेच्या संचालिका सौ. अनामिका जाधव प्रभाग क्रमांक ८ मधून निवडणुकीच्या रिंगणात
राजापूर नगर परिषदची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी कडून सौ.अनामिका सौरभ जाधव पूर्वाश्रमीची कु.लीना रविकांत मेळेकर.(रा:- चव्हाणवाडी, राजापूर) प्रभाग क्रमांक ८/अ मधून निवडणूक लढवत आहेत.
सौ. अनामिका जाधव या राजापूरची माहेरवाशीण असल्याने इथले प्रश्न व समस्या यांचेशी पूर्णपणे परिचित आहेच. पण ते सोडवण्याची त्यांची प्रामाणिक तळमळ, धडपड आहे. सौ. अनामिका जाधव २००७ सालापासून सार्वजनिक कार्यात व राजकारणात सक्रिय आहेत. या त्यांच्या समाज कार्याला त्यांचे सासरे कै. हरिश्चंद्र महादेव जाधव.(वेत्ये,पाथर्डे)यांचा आशीर्वाद, तर त्यांचे पती व मुलांचा सक्रिय पाठिंबा आहे. त्यामुळेच सौ. अनामिका जाधव यांचे वास्तव्य पाथर्डे, कोदवली येथे असताना त्यांनी दोन वेळा जिल्हा परिषद निवडणूक लढविली आहे. तसेच एकदा बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले आहे. सौ. अनामिका जाधव यांनी २०१५ सालची नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक दोन (ज्यात माझे वास्तव्य आहे.)मधून लढवली होती. सौ. अनामिका जाधव वाणिज्य शाखेच्या पदवीधर असूनही, सध्या दूरस्थ शिक्षण घेत एम.कॉम च्या दुसऱ्या वर्षाला आहे.
सार्वजनिक आयुष्यात सौ. अनामिका जाधव यांनी अनेक संस्थावर काम केले आहे. अनेक बचतगट, महिला ढोल पथक, महिला मंडळ, सामाजिक आणि राजकीय संस्थांवर विविध पदे भूषवून,त्यांना सक्षम पणे पुढे नेण्यात सौ. अनामिका जाधव यांचा नेहमीच हातभार लागला आहे. याबद्दल त्या स्वतःला भाग्यवान समजते.
राजापूरचा मानबिंदु असलेल्या, राजापूर अर्बन बँकेच्या संचालक मंडळात अनामिका जाधव यांना सलग दोनवेळा निवडून दिले आहे. तसेच दोनवेळा बँकेचे अध्यक्ष पद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला आहे.
तेव्हा यावेळी राजापूर शहरातील, प्रभाग क्रमांक ८ मधील समस्यांना व अन्यायाला थेट नगर परिषद सभागृहात वाचा फोडण्यासाठी, शहरातील प्रलंबित प्रश्न व मागण्यांना योग्य व्यासपीठावर दाद मागण्यासाठी सौ. अनामिका जाधव या निवडून आल्या पाहिजेत असा निर्धार शहरातील अनेक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
Comments
Post a Comment