सुगंधित तंबाखूसह ६ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त*अहेरी पोलिसांची कारवाई
* *सुगंधित तंबाखूसह ६ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त*
अहेरी पोलिसांची कारवाई
याप्रकरणी शंकर माऱ्यालू भीमराजुलवार (३६, रा. सावरकर चौक, आलापल्ली) याला अटक करण्यात आली असून, प्रीतम राजेश पेटेवार (३०, रा. श्रमिकनगर, आलापल्ली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुगंधित तंबाखू व चारचाकी वाहन, असा एकूण ६ लाख १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चारचाकी वाहनातून सुगंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अहेरी पोलिसांना मिळाली. या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचला असता, आलापल्ली-भामरागड मार्गावर एमएच ३३ ए ४३०१ या क्रमांकाचे वाहन संशयास्पदरीत्या आढळून आले. या वाहनाची तपासणी केली असता, वाहनात पांढऱ्या रंगाच्या सात पिशव्यांमध्ये तब्बल २८० नग प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला. पोलिसांनी कारवाई करीत ३ लाख १६ हजार ४०० रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व ३ लाख रुपये किमतीचे वाहन, असा एकूण ६ लाख १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींवर गुन्हा दाखल केला.
Comments
Post a Comment