राजापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचाच विजय निश्चित: काँग्रेस तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांची प्रतिक्रिया

राजापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी चार पक्षांची महाविकास आघाडी झाली असून या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया राजापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जितेंद्र खामकर यांनी व्यक्त केली आहे. 

राजापूर नगर परिषदेची निवडणूक एक जागा ही थेट नगराध्यक्ष पदाची असून वीस जागा नगरसेवकांसाठी आहेत. या निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक काँग्रेस पक्ष लढवत असून नगरसेवक म्हणून देखील काही जागांवर काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार आहे तर काही जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निवडणूक लढणार आहे. जागा वाटपाचा निश्चित आकडा अद्याप ठरलेला जरी नसला तरी देखील जागावाटप कशा पद्धतीने झाली आहे ते लवकरच सर्वांना समजणार आहे. 

राजापूर शहरांमध्ये ॲड. हुस्नाबानू खलिफे यांनी विधान परिषदेच्या आमदार असतानाच्या काळात अनेक विकासाची कामे केली आहे. त्याचप्रमाणे 2004 साली त्यात थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर सुद्धा भरीव अशी विकास कामे केली होती. मागील अनेक वर्षे राजापूर नगर परिषदेवर काँग्रेस महाविकास आघाडीचाच झेंडा फडकलेला आहे. ॲड. जमीर खलिफे नगराध्यक्ष असताना त्यांनी देखील राजापूर शहरात अनेक विकास कामांना शासनाकडून निधी मंजूर करून आणून सदर विकासाची कामे अत्यंत चांगल्या दर्जाची करण्यात आली आहेत. राजापूर शहराचा विकास कोण करू शकतो हे राजापूर शहराच्या नागरिकांना चांगले माहीत असल्यामुळे राजापूर शहरातील नागरिकांचा काँग्रेस महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेस तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांनी व्यक्त केली आहे.

Comments