राजापूर तालुक्यात धूप कापूर अगरबत्तीचे वाटप, पावसाळ्यात छत्र्या वाटप, पण विकास कामांच्या नावाने बोंबाबोंब, पक्ष प्रवेश होतो तिथेच विकास कामांना निधी, फडणवीस साहेब जरा राजापूरच्या बेरोजगावर सुद्धा विचार कराल का?
राजापुरात धूप कापूर अगरबत्तीचे वाटप होते. पावसाळ्यात छत्र्या वाटप होते. पण गावागावात विकास कामे काही होताना दिसून येत नाहीयेत. सगळीकडे विकास कामांच्या नावाने बोंबाबोंब सुरू आहे. तर शासनकर्त्यांचे बेरोजगारीच्या दृष्टीने सुद्धा काही ठोस पावले उचलताना दिसून येत नाहीयेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत काही लक्ष देतील का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राजापूर तालुक्यातील वाटूळ येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होणार होते. त्यासाठी जागा सुद्धा निवडण्यात आली. निवडणुकीच्या अगोदर किती तरी फोटो शूट करण्यात आले. भूमिपूजन झाले. पण आता ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कुठे आहे? कुठे गेले ते हॉस्पिटल राज्यकर्त्यांकडून याबाबत काहीच चर्चा होताना दिसून येत नाहीये. निवडणूक काळात श्रेयवाद मात्र भडकला होता.
नाटे घेरा यशवंतगड किल्ल्याला सुमारे आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मंजूर निधीचे श्रेय घेण्यात आले. पण किल्ल्याचे काम चालू असताना तो किल्ला ढासळला कसा. त्याच्या चौकशीची मागणी करण्यात आली. पण चौकशी काही होताना दिसून येत नाहीये.
राजापुरात अनेक उद्योग, एम आय डी सी प्रकल्पांच्या घोषणा करण्यात आल्या. निवडणुकीनंतर सुद्धा वेगवेगळ्या कंपन्यांच्या घोषणा झाल्या. पण कंपन्या काही आल्या नाहीत. रत्नागिरी तालुक्यातील काही कंपन्या बंद पडल्या त्या काही चालू झाल्या नाहीत. मग राजापुरात अशा कोणत्या कंपन्या येणार होत्या?
राजापूर तालुक्यातील रस्त्यांची काय अवस्था आहे. ओणी पाचल अनुस्कुरा रस्त्याची काय अवस्था आहे. अक्षरशः खड्ड्यांचे साम्राज्य आहे. डोंगर विल्ये पडवे रस्त्याची काय अवस्था आहे. नाटे रस्त्याची अवस्था काय आहे? मुख्यमंती ग्राम सडक योजनेतून रस्ते मंजूर झाले. त्या रस्त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे. काही ठिकाणी कामे पूर्णच झालेली नाहीत. काही ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्ते गेल्या वर्षी केले या वर्षी खड्डे पडले अशी अवस्था आहे. अशी अवस्था राजापूर तालुक्यातच का आहे? असे उलट सुलट सवाल उपस्थित केले जात आहेत.
राजापूर तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. पण उद्योग व्यवसाय का येत नाहीयेत. उद्योग येण्यासाठी काहीच प्रयत्न का होताना दिसून येत नाहीयेत?
असे उलट सुलट सवाल उपस्थित केले जात आहेत.
Comments
Post a Comment