रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ८ निवखोल, थिबा पॅलेस रोड, हिंदू कॉलनी या भागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून साजिद पावसकर निवडणूक लढणार
रत्नागिरी नगर परिषद निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ८ निवखोल, थिबा पॅलेस रोड या भागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून साजिद पावसकर निवडणूक लढवणार आहेत. गेली अनेक वर्षे या भागातील विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. सत्ताधाऱ्यांकडून हे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे यावर्षी साजिद पावसकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार या भागातील अनेक नागरिकांनी घेतला असल्याचे बोलले जात आहे.
रत्नागिरी शहरातील निवखोल, आदमपूर, निवखोल हिंदू वाडी, मेंटल हॉस्पिटल, माळनाका, नलावडे वाडा, मारुती मंदिर स्टेडियम, मारुती मंदिर मच्छी मार्केट परिसर, खतीब कॉलनी, हिंदू कॉलनी, आनंद नगर, रुबी अपार्टमेंट, हाउसिंग कॉलनी, थिबा पॅलेस परिसर, एस टी कॉलनी, एस वी रोड हे क्षेत्र या प्रभाग क्रमांक ८ मध्ये येतात. या प्रभागात मुख्यत्वे करून रस्त्यांचे प्रश्न आहेत. युवकांना चांगल्या क्रीडांगणाची आवश्यकता आहे. शिवाय स्ट्रीट लाईटची सुयोग्य व्यवस्था नसल्याचे साजिद पावसकर यांनी सांगितले.
साजिद पावसकर गेली अनेक वर्षे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत. प्रभागातील नागरिकांसाठी रक्तदान शिबिरे, नेत्रदान शिबिरे अशी अनेक सामाजिक कार्यक्रम ते आयोजित करत असतात. सिव्हिल हॉस्पिटल किंवा अन्य खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा लोकांना काही अडीअडचणी असतील तर साजिद पावसकर नेहमीच मदतकार्य करत असतात. त्यामुळेच यावर्षीच्या रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत साजिद पावसकर यांनाच निवडून देण्याचा निर्धार या भागातील नागरिकांनी घेतला असल्याचे बोलले जात आहे.
Comments
Post a Comment