रत्नागिरीत उद्योग नाही, शहराच्या आजूबाजूचे काही मोठे उद्योग बंद पडले, तरुणांच्या हाताला काम नाही, निवडणुकीच्या कारणाने येणाऱ्या नेत्यांना हे प्रश्न लोक विचारतील का?
रत्नागिरीतील चंपक मैदानात काय ते उद्योग येणार होते म्हणून मोठ मोठ्या पत्रकार परिषदा घेतल्या गेल्या. सेमी कंडक्टर प्रकल्प येणार असल्याची माहिती दिली होती. अजून पर्यंत हा प्रकल्प काही आलाच नाही. वाटद खंडाळा परिसरात रिलायन्सच्या डिफेन्स प्रोजेक्ट येणार होता. त्याबाबत आता कुठे काही वाच्यता नाही. रत्नागिरी शहराच्या आजूबाजूचे काही मोठे प्रकल्प बंद पडले. ना उद्योग ना कुठल्या रोजगाराच्या संधी. युवक बेरोजगार आहेत. त्यामुळे आगामी रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने घरी आलेल्या नेते आणि पुढाऱ्यांना रत्नागिरी शहरातल्या बेरोजगारीच्या प्रश्नावर लोक प्रश्न विचारतील का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
रत्नागिरी शहरांमध्ये मासेमारीचा मोठा व्यवसाय आहे. मात्र मच्छीमारांचे देखील अनेक प्रश्न आहेत. रत्नागिरी शहराला लागून मांडवी समुद्रकिनारा पर्यटन स्थळ, रत्नदुर्ग किल्ला, भगवती बंदर, मिरकर वाडा जेटी, पांढरा समुद्र किनारा, अशी चांगली पर्यटन स्थळे मंदिरे असताना देखील रत्नागिरी शहरातल्या युवकांना चांगल्या दर्जाचा रोजगार उपलब्ध झालेला दिसून येत नाही. मोठमोठ्या शिक्षण संस्था रत्नागिरी मध्ये आहेत. मात्र त्या ठिकाणी स्थानिक शिक्षक किती आहेत हा मोठा प्रश्न आहे. रत्नागिरी शहरांमध्ये शासकीय आणि खाजगी हॉस्पिटल आहेत. त्या ठिकाणी स्थानिक डॉक्टर किती आहेत स्थानिक नर्स किती आहेत हा देखील मोठा प्रश्न आहे.
त्यामुळे निवडणूक काळात मतदानासाठी घरी येणाऱ्या नेत्यांना व पुढाऱ्यांना बेरोजगारीच्या प्रश्न बाबत काही विचारतील का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
Comments
Post a Comment