खेड नगर पंचायत निवडणुकीसाठी नागरिकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळतोय मोठा प्रतिसाद!

रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकीत खेड नगर परिषद निवडणुकीसाठी बऱ्याच नागरिकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा मिळत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना आणि त्यावेळी पालक मंत्री म्हणून ॲड. अनिल परब कार्यरत असताना खेड शहरात भरीव विकास कामे मंजूर करण्यात आली होती. कोरोना काळात देखील स्थानिक शिवसैनिकांनी नागरिकांची खूप चांगली सेवा केली आहे. त्यामुळे या वेळच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याच उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार खेड बऱ्याचशा नागरिकांमधून मिळत असल्याचे बोलले जात आहे. 

Comments