रा.भा.शिर्के प्रशालेचे "इन्स्पायर" यश*

*रा.भा.शिर्के प्रशालेचे "इन्स्पायर" यश*

*राज्य विज्ञान संस्था,नागपूर आणि शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या इन्स्पायर ॲवॉर्ड मानक २०२३/२४ व २०२४/२५ ह्या वर्षांतील निवडक मॉडेल्सच्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात रा.भा.शिर्के प्रशालेच्या कु.तन्मय लक्ष्मण कोकरे (इ.९वी) ह्या विद्यार्थ्याच्या मॉडेल्सची राज्य स्तरासाठी निवड झाली.*
     *तन्मयने FOOD SPOILAG DETECTOR हि प्रतिकृती प्रदर्शनात मांडली होती.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण १०३ मॉडेल्स स्पर्धेत होते.रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या CEO मा.सौ.वैदेही रानडे मॕडम आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.श्री.किरण लोहार साहेब यांच्या शुभहस्ते तन्मयला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.तन्मयला मुख्याध्यापक श्री.कांबळे,श्री.मुंडेकर,श्री.पडवेकर,श्री.चव्हाण आणि पालक यांचे मार्गदर्शन लाभले.*
  *रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी,प्रशालेचे सर्व शिक्षकवृंद यांनी तन्मयचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.*

Comments