राजापुरात निवडणूक सुरू असताना जवाहर चौक ते तालीम खाना रस्त्याचे डांबरीकरण सुरू झाल्याने संशयाचे वातावरण? निवडणूक काळात रस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यासाठी परवानगी कोणी दिली आणि कोणत्या कायद्यांतर्गत दिली?

राजापूर नगर परिषदेची निवडणूक सुरू असताना ऐन निवडणुकीच्या या शासकीय सणाच्या काळात रस्त्यावर बॅरिकेटिंग करून रस्ता डांबरीकरणाची कामे सुरू झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजापूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे ग्रामीण भागातून असंख्य लोक आपल्या गाड्या घेऊन राजापूर शहरांमध्ये येत असतात. मात्र राजापूर तालुक्याच्या जनतेला कुठलाही वर्तमानपत्राच्या माध्यमातून कल्पना न देता जवाहर चौक ते तालीम खाना यादरम्यान रस्त्यावर बॅरिकेटिंग करून रस्त्यावरची वाहतूक बंद ठेवून खड्डेमय असलेल्या भागांमध्ये डांबरीकरणाची कामे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता या रस्ता डांबरी करण्याच्या कामाला राजकीय वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

राजापूर नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे. निवडणूक हा एक प्रकारे शासकीय सणच असतो. मात्र या शासकीय सणाच्या काळामध्ये जवाहर चौक ते तालीम खाना यादरम्यान रस्त्यावर बॅरिकेटिंग करून डांबरीकरणाची कामे सुरू झाली आहे. असे सांगण्यात येत आहे की ठेकेदाराच्या लायबिलिटीच्या काळामध्ये हे डांकरण्याची कामे सुरू आहेत. प्रशासनाने अशा प्रकारचे रस्ते अडवून रस्त्याला बॅरीगेटिंग करून ऐन निवडणुकीच्या काळात रस्ता डांबरीकरण करण्याची परमिशन दिली आहे का. परवानगी दिली असेल तर ती कोणत्या कायद्यान्वये दिली आहे. डांबरीकरणाची कामे करायचीच होती तर आचारसंहिता लागण्यापूर्वी किंवा आचारसंहिता संपल्यानंतर का करता येऊ शकत नाहीत का? आचारसंहिता तीन-चार डिसेंबर नंतर संपणार आहे मग त्या काळात रस्त्यावरचे खड्डे भरता येणार नाहीत का? 

राजापूर तालीमखाना ते जवाहर चौक खड्डे मे भागात रस्त्यावर डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात आली आहे त्याबाबत तालुक्यातल्या जनतेला प्रशासनाकडून काही मेसेज देण्यात आला होता का? असे सवाल सध्या उपस्थित करण्यात येत आहेत. 

Comments