“आर भीमा — तुझं संविधान विकलंय रे!”कवी...प्रविण किणे ..अधिनायक

👇


“आर भीमा — तुझं संविधान विकलंय रे!”

(कवी...प्रविण किणे ..जननायक

)

आर भीमा —
तुझं संविधान विकायला काढलं रे,
निवडणुकीच्या गटारात!
आणि उत्सव केला —
या हरामखोरांनी,
फुलं टाकली पायावर भ्रष्टाचाराच्या!!

गल्लीतल्या भिंतीवर लावला तुझा फोटो,
खाली ‘जय भीम’ लिहिलं,
वरती घेतली नोटांची चकाकी,
आणि जनता — अजून टाळ्या वाजवते रे भीमा!

शिवबा माझा असता,
तर या लाळघोट्यांना टकमक टोकावरून नाही —
तर इतिहासाच्या पानातूनच पुसलं असतं!

पण आता शिवबा नाही,
आहेत फक्त बॅनर, पोस्टर,
आणि ‘सेल्फी घेतो’ म्हणणारे नायक!

देश विकला जातोय रे भीमा,
संविधान विकलं जातंय रे भीमा,
आणि आपण मात्र अजून ‘जय’ म्हणतोय —
‘भीम’ विसरून!

उठा रे जनतेनो,
उठा — या झोपलेल्या काळात,
आर भीमाच्या नावानं जाळा ही भुकटी,
आणि पुन्हा लिहा संविधान —
जनतेच्या रक्तातलं,
घामातलं,
आणि स्वाभिमानातलं!


प्रविण किणे 

7020843099 

लढाई संविधानाची 

Comments