एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीनंतरही ऑपरेशन लोट्स काही थांबलेले दिसत नाही

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Sambhajinagar: एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीनंतरही ऑपरेशन लोट्स काही थांबलेले दिसत नाही. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे सेनाला मोठा झटका बसला आहे. शिंदे मराठवाड्यावर जातीने लक्ष ठेऊन असतानाच भाजपने शिंदेसेनेला कात्रजचा घाट दाखवला आहे.
नगरपालिका निवडणुकीतील फोडाफोडीच्या राजकारणामुळे मोठे संकट उभं ठाकलं आहे. एकनाथ शिंदे यांची नाराजी समोर आली होती. त्यांनी या नाराजीतून दिल्लीवारी सुद्धा केली. पण त्यातून काही खास हाती लागल्याचे दिसून आले नाही. कारण राज्यात भाजप मित्रपक्षाला एकामागून एक धक्के देत असल्याचे दिसून येत आहे. असेच एक धक्कातंत्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपालिकेत दिसून आला. येथे शिंदे गटाचा हुकमी एक्काच भाजपने फोडला आहे.

Comments