गणपतीपुळे जनआंदोलनाची हाक
🌊 गणपतीपुळे जनआंदोलनाची हाक
पश्चिम दिशेचा रक्षक — गणपतीपुळे!
परंतु हाच पवित्र समुद्रकिनारा आज शोकाचा साक्षीदार बनला आहे.
दरवर्षी हजारो गणेशभक्त आणि पर्यटक या समुद्रात जीव गमावतात...
आज पुन्हा एक जीव मृत्यूच्या लाटेत अडकला!
प्रविण किणे
प्रश्न आहे —
ग्रामपंचायत आणि प्रशासन झोपेत आहे का?
गोव्यासारखी आधुनिक लाईफगार्ड सिस्टीम येथे का नाही?
का दरवर्षी नाहक जीव द्यावा लागतो आणि आपले गणपतीपुळे पर्यटन बदनाम व्हावे?
---
✊ आमची मागणी स्पष्ट आहे :
1. गणपतीपुळे किनाऱ्यावर कायमस्वरूपी प्रशिक्षित जीव रक्षक नेमावेत.
2. सीसीटीव्ही आणि चेतावणी फलक सर्व धोका असलेल्या ठिकाणी लावावेत.
3. पर्यटन विभाग, ग्रामपंचायत व पोलीस यांच्यात समन्वय प्रस्थापित करावा.
4. स्थानिक तरुणांना लाईफगार्ड प्रशिक्षण देऊन रोजगार द्यावा.
---
ही लढाई कोणाच्या विरोधात नाही,
ही लढाई आपल्या गणपतीपुळे पर्यटनाच्या अस्तित्वासाठी आहे.
🙏 आपली साथ हवी.
चला, गणपतीपुळे सुरक्षित, सुंदर आणि पर्यटकस्नेही बनवूया!
https://chat.whatsapp.com/LONrsGYBeAG9i89zhJNaUe?mode=wwt
Comments
Post a Comment