राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकिसाठी प्रभाग चार ब मधून काँग्रेसचे माजी तालुक्याध्यक्ष सुभाष बाकाळकर यांना उमेदवारी, पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख

राजापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लागली आहे. या निवडणुकीमध्ये राजापूर शहरातील प्रभाग क्रमांक ४(ब) मधून काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष शाम बाकाळकर निवडणूक लढवत आहेत. सुभाष बाकाळकर हे १९९९ सालापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत. तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष, युवक अध्यक्ष, काँग्रेस बेसिक शहर अध्यक्ष अशी विविध पदे पक्षाने त्यांना दिली होती. राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत २०१६ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. २०१८ मध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. त्यानंतर पक्षाच्या शिफारसीनुसार आणि काँग्रेस नेत्या, माजी विधान परिषद आमदार ॲड. हुस्नाबानू खलिफे यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष बाकाळकर राजापूर नगर परिषदेत उपनगराध्यक्ष झाले.

राजापूर नगर परिषदेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सुभाष बाकाळकर यांनी प्रभागातील बंगलवाडी व वरची पेठ भागाचे प्रतिनिधित्व करताना मागील 40 ते 45 वर्षापासून रखडलेली सार्वजनिक विकासाच्या कामांचा धडाका सुरू केला. त्यांच्या कार्यकाळात आणि त्यांच्या शिफारसीनुसार प्रियदर्शनी वसाहत बंगालवाडी गुरववाडी भागासाठी नवीन दोन लाख लिटर पाण्याची टाकी बांधण्यात आली. मारुती मंदिर वरची पेठ येथे संरक्षक भिंत, वरची पेठ भागामध्ये ऍक्टिव्हिटी सेंटर जिम व एक सभागृह, राजीव गांधी मैदानामध्ये वॉकिंग ट्रॅक, राजीव गांधी मैदानामध्ये पथदीप बसवण्यात आले. बलबले मस्जिद ते महापुरुष मंदिर रस्ता डांबरीकरण, गोठणकर सर घर ते मारुती मंदिर मुख्य रस्ता डांबरीकरण व श्री शंकर कोळेकर घराजवळ रस्ता रुंदीकरणासाठी संरक्षक भिंत, तेली वठार विहीरी जवळ पेवर ब्लॉक सुशोभीकरण, प्रभागातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण व काँक्रीटचे रस्ते नवीन केले. वरची पेठ शाळा भागातील नागरिकांसाठी नवीन पाण्याची लाईन टाकण्यात आली. त्याचप्रमाणे मुंबई गोवा हायवे ते उदय मांडवकर घर रस्ता डांबरीकरण करण्यात आले. बंगलवाडी श्री गुरव घरा जवळ रस्ता डांबरीकरण करण्यात आले. अशी विविध विकासाची कामे सुभाष बाकाळकर यांच्या कार्यकाळात झाली. 

काँग्रेस पक्षातली एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून सुभाष बाकाळकर यांची ओळख आहे. युवक काँग्रेस पासून ते बेसिक काँग्रेस पर्यंत विविध पदावर त्यांनी काम केले आहे. म्हणूनच यावर्षीच्या राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून सुभाष बाकाळकर यांना प्रभाग चार ब मधून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रभागातील अनेक लोकांनी व सामाजिक संस्थांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. सुभाष बाकाळकर हेच पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले पाहिजेत असा निर्धार या प्रभागातील बहुतांश कार्यकर्त्यांमधून करण्यात आला आहे. 

Comments