राजापूरचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे प्रभाग ६ मधून निवडणूक लढवणार, रानतळे पिकनिक स्पॉटचे नूतनीकरण, गणेश विसर्जन घाट, देवझरी स्थळाचा विकास आदी कामे त्यांच्या कार्यकाळात झाली

राजापूर नगरपरिषदेच्या 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी महाविकास आघाडी झाली असून शहरातील प्रभाग क्रमांक सहा (ब) मध्ये काँग्रेस पक्षाकडून माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड. जमिर खलिफे निवडणूक लढवत आहे. ॲड. जमिर खलिफे 2008 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून प्रभाग सहा मधून निवडून आले. २०११ व २०१६ मध्ये पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. 2011 पासून ॲड. जमिर खलिफे नगर परिषदेतील गटनेता आणि पक्ष प्रतोद म्हणून काँग्रेस पक्षाने मोठी जबाबदारी दिली. 2018 मध्ये राजापूर नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये ॲड. जमिर खलिफे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भरघोस मतांनी निवडून आले. 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ॲड. जमिर खलिफे प्रभाग क्रमांक सहा मधून काँग्रेस पक्षाच्या हात या निशाणीवर ते पुन्हा निवडणूक लढवत आहेत. ॲड. जमिर खलिफे यांना प्रभागातील बहुतांश नागरिकांमधून मोठा पाठिंबा मिळत आहे. 

राजापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून ॲड. जमिर खलिफे यांनी नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदावर असताना अनेक महत्त्वाचे व विकासाचे निर्णय घेतले. ॲड. जमिर खलिफे यांनी आत्तापर्यंतच्या नगरपरिषदेच्या कार्यकाळामध्ये राजापूर शहरातील अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक टाकून रस्ते स्वच्छ व चांगल्या दर्जाचे करण्यात आले आहेत. रानतळे पिकनिक स्पॉटचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आले. बंगलवाडी प्रियदर्शनी वसाहत व कोंढेतड येथे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी २ लाख लिटर क्षमतेच्या २ पाणी साठवण टाक्या बांधण्यात आल्या आणि तिथला पाणी प्रश्न मार्गी लावला. संपूर्ण शहरात एलईडी पथदिवे उभारण्यात आले व शहर प्रकाशमय केले. राजीव गांधी क्रीडांगण येथे भव्य ऍक्टिव्हिटी सेंटर व व्यायामशाळा उभारण्यात आली. गणेशोत्सव काळात गणपती विसर्जनाकरिता सुसज्ज गणेश विसर्जन घाट याचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आले. जवाहर चौक परिसरातील नन्हेसाहेब पुलाचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आले. दिवटेवाडी येथील देवझरी या स्थळाचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आले. रानतळे विभाग राजापूर फिडरला जोडले. त्यामुळे महावितरण संदर्भातील त्यांची कायमस्वरूपी समस्या सुटली.

माजी विधान परिषद आमदार व काँग्रेस नेत्या ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासाठी आवश्यक पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण बाबत डीपीआर तयार करून भविष्यातील राजापूर वासियांचा पाण्याचा प्रश्न व मलनिस्सारणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी प्रयत्न केले. ॲड. जमिर खलिफे यांनी राजापूर शहराच्या विकासासाठी निधी मंजूर करून आणण्यासाठी मंत्रालय स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला. त्याचाच प्रत्येक म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी राजापुरातील सायबाच्या धरणासाठी सुमारे दहा कोटी एवढा निधी मंजूर करून दिला. त्यामुळे नवीन सायबाच्या धरणाचे काम जोमाने सुरू झाले. राजापूर आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून देखील त्यांनी सतत पाठपुरावा केला. कोरोनाच्या काळामध्ये ॲड. जमिर खलिफे संपूर्ण राजापूर शहरामध्ये खूप मदत कार्य केले. 

या सगळ्या कामामुळेच ॲड. जमिर खलिफे त्यांना आजही नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Comments