राजापूर नगर परिषदेवर महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल

राजापूर नगर परिषदेवर महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल

माजी आमदार गणपतराव कदम, माजी आमदार ॲड. हुस्नाबानू खलिफे यांची पत्रकार परिषदेत माहिती

जनमत असणाऱ्या उमेदवारालाच निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल 

राजापूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, मनसे मिळून एकत्र महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत

रत्नागिरी प्रतिनिधी:- 
राजापूर नगर परिषद निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत आणि या निवडणुकीत आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास आज राजापूर येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला. यामध्ये प्रामुख्याने राजापूरचे माजी आमदार गणपतराव कदम आणि माजी विधान परिषदेच्या आमदार ॲड. हुस्नाबानू खलिफे उपस्थित होत्या. 
या पत्रकार परिषदेत माजी आमदार गणपतराव कदम म्हणाले की, राजापूर तालुक्यात शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांच्या विरुद्ध लढायचो. पण आता आम्हाला नियतीने एकत्र आणले आहे. राजापूर नगर परिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी महाविकास आघाडी झालेली आहे. आणि ही निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. मात्र कोणत्या प्रभागात उमेदवार कसे कसे असतील ते उमेदवारी अर्ज भरताना सगळ चित्र फायनल होईल. कुठल्या पक्षाने किती जागा लढायच्या हे लवकरच निश्चित होईल. फक्त आजच्या तारखेला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचा निश्चित झालेला आहे. या निवडणुकीत वीसच्या वीस जागा महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. या निवडणुकीत महाविकास आघाडी स्पष्ट बहुमत घेऊ अशी आम्हाला खात्री आहे. अशी माहिती माजी आमदार गणपत कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या पत्रकार परिषदेत माजी विधान परिषदेच्या आमदार ॲड. हुस्नाबानू खलिफे म्हणाल्या की, राजापूर नगर परिषदेवर मागील चार वर्षे नागरिकांची ससेहोलपट झाली. निवडणुका झाल्या नव्हत्या. यावेळच्या राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढत आहोत. त्याशिवाय राजापूर शहरातील काही पतसंस्था, सामाजिक संस्था, मंडळे, बँकांचे संचालक, आदी संस्थांशी सुद्धा आम्हाला पाठिंबा देण्यासाठी संपर्क सुरू आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजापूर शहरातील काही लोक विद्यमान आमदारांना भेटायला गेले अशी चर्चा आहे. मात्र ते राजापूरचे आमदार आहेत त्यांना भेटू शकतात. विकासाचे प्रश्न मांडू शकतात. परंतु काँग्रेस पक्षातील कुणी सक्रिय कार्यकर्ते विरोधकांच्या पक्षात प्रवेश करतील असे आम्हाला सध्या तरी वाटत नाही. आम्ही विरोधक म्हणून तस कुणाकडे बघत नाही आहोत. आमच्याही संपर्कात अनेक लोक आहेत. आम्ही सुद्धा आमच्या संपर्कात येत असलेल्या लोकांशी चर्चा करत आहोत. पण आम्ही आता या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत हे निश्चित झालेले आहे. राजापूर शहरात ज्याच्याकडे जनमत आहे, ज्याच्याकडे निवडून येइल असे वाटत आहे त्याला उमेदवारी देण्यात येईल. शंभर टक्के निवडून येण्याची शक्यता असलेलेच उमेदवार आम्ही निवडणुकीला उभे करणार आहोत. त्यामुळे आम्हाला असे वाटत आहे की यावेळच्या निवडणुकीत महाविकास आघाडी निश्चितच यश प्राप्त करेल अशी आम्हाला खात्री आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जात आहेत. जाऊदेत. थोड्या दिवसांनी परत येतील. आम्ही तर मागील काही वर्गात आमच्या काँग्रेस, शिवसेना पक्षातील अनेक नेते मंडळी, अगदी माजी मुख्यमंत्री सुद्धा दुसऱ्या पक्षात जाताना पाहिलेले आहे. ते सगळे आम्ही सहन केले आहे. मला स्वतःला ३ तारखेला फोन आले की तुमचा शिंदे गटात पक्ष प्रवेश आहे का? आम्ही सांगितले की आम्ही कुणीही काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही. सगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. अशी प्रतिक्रिया माजी विधान परिषदेच्या आमदार ॲड. हुस्नाबानू खलिफे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेत शिवसेना (उबाठा) विधानसभा क्षेत्रप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, काँग्रेस तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख कमलाकर कदम, शिवसेना (उबाठा) नेते तात्या सरवणकर, माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे, माजी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, अनिल कुडाळी, संजय पवार, अभय मेळेकर, मनसेचे श्री पवार, काँग्रेस शहराध्यक्ष अजीम जैतापकर आदी पदाधिकारी, नेते मंडळी उपस्थित होते.
home.mangocity.org

शेती 12 लाख 
उत्पन्न 3 वर्षात 12 लाख 

माचाळ थंड हवेचे ठिकाण 
9.10 लाख (नऊ लाख दहा हजार)
5 गुंठे जागा व 20 x 10 शेती घर 

समुद्रकिनारी जागा 
3 लाख गुंठे 
( किमान 5 गुंठे)

7020843099 

ऑफर निवडणुकीच्या काळात फक्त

Comments