विश्व हिंदू परिषदेच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा व्यापक बैठकीमध्ये दिनदर्शिकेचे प्रकाशन विश्व हिंदू परिषदेच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा व्यापक बैठकीमध्ये दिनदर्शिकेचे प्रकाशन

विश्व हिंदू परिषदेची जिल्हा व्यापक बैठक नावथ्ये मंगल कार्यालय येथे नुकतीच संपन्न झाली या बैठकीत सर्व प्रखंड आणि खंड स्तर कार्यकर्ते हजर होते. विश्व हिंदू परिषदेच्या 2026 साला साठीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन या बैठकीत झाले ही दिनदर्शिका गोसेवा आणि गोरक्षा या आयामासाठी संपूर्ण माहिती असलेली मार्गदर्शक दिनदर्शिका आहे. यामध्ये वैदिक काळापासून विविध गाईंचे महत्त्व, गोसेवा आयोग माहिती, गोरक्षा विषयक असलेले विविध कायदे आणि विविध तरतुदी, तसेच जिल्ह्यात असलेल्या गोशाळांची माहिती, शिवाय विविध दिनविशेष समाविष्ट आहेत. या बैठकीची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, त्रिवार ओंकार, एकात्मता स्तोत्र आणि श्रीराम विजय मंत्र गायनाने झाली. बैठकीचे प्रारंभिक सत्राला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक मा. दत्ताजी सोलकर यांनी कुटुंब प्रबोधन आणि पंच परिवर्तन या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्ह्यात झालेल्या, दुर्गापूजा, वसुबारस गोपूजन, मंदिर स्वच्छता अभियान बाबत आढावा घेण्यात आला. 

तसेच बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष सौ उमाताई देवळे, विभाग मंत्री श्री विवेकजी वैद्य, सह मंत्री श्री दत्तात्रय जोगळेकर, श्री उदयजी चितळे, विभाग मातृ शक्ती प्रमुख सौ माधवीताई हर्डीकर यांनी विचार मांडले. सूत्र संचलन जिल्हा मंत्री दीपकजी जोशी यांनी केले. समारोप संपूर्ण वंदे मातरम् म्हणून सौ अर्चना वैश्यंपायन यांनी केला. आगामी दुर्गा वहिनी प्रशिक्षण वर्ग, बजरंग दल प्रशिक्षण वर्ग, धर्म प्रसार सप्ताह, नैतिक शिक्षण परीक्षा दिनदर्शिका वितरण या कार्यक्रमांची निश्चिती या बैठकीत झाली. 🚩🙏 

Comments