राजापूर तालुक्यातील तळवडे येथे बिगर परवाना गावठी हातभट्टीची दारू बाळगणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
राजापूर तालुक्यातील तळवडे कुंभारवाडी गावठी हातभट्टीची दारू गैर कायदा बिगर परवाना विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताबेकब्जात बाळगल्याप्रकरणी रायपाटण पोलिसांनी एका इसमावर कारवाई केली आहे. 18 लिटर गावठी हातभट्टीची दारू सुमारे किंमत 1900 रुपये एवढा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आला आहे. रायपाटण येथील पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल घाटगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा राजापूर पोलीस ठाणे येथे पुन्हा रजिस्टर नंबर 212/२०२५ मध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment