रत्नागिरी पत्तन अभियंता कार्यालयाला सध्या काही विशेष काम नाही? अधिकारी नेहमीच अशी उत्तरे देतात. मग ज्यांना काम नाही त्यांना दुसऱ्या विभागात का पाठवले जात नाही? एवढे कर्मचारी पत्तन विभागात नेमके काय काम करत आहेत? जनतेतून उपस्थित होतोय सवाल

रत्नागिरी येथील पत्तन अभियंता कार्यालयात कधीही लोक गेले तरी आम्हाला सध्या काही फार काही काम नाही. आम्हाला फार काही निधी नाही अशीच उत्तरे मिळतात. मग पत्तन कार्यालयाला फार काही काम नसेल तर मग एवढे कर्मचारी नेमके कोणते काम करत असतात? काम नाही तर मग एवढ्या कर्मचाऱ्यांचा पगार कोण देत आहेत? आणि बिन कामाचे कर्मचारी तिथे काम करत असतील तर त्यांना विनाकारण पगार का दिला जात आहे. राज्य शासनाने रत्नागिरी जिल्हा पत्तन अभियंता कार्यालयाच्या कामाबाबत सविस्तर चौकशी करावी अशी मागणी सध्या होत आहे.

रत्नागिरी जिल्हा पत्तन अभियंता कार्यालयातून विशेष करून खाडी किनारी संरक्षक भिंती, धूप प्रतिबंधक बंधारे, मच्छी ओटे अशा प्रकारची कामे केली जातात. मात्र रत्नागिरीत सध्या पांढरा समुद्र पंधरा माड येथे धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे २०२३ पासून काम सुरू आहे ते अद्याप पूर्ण झालेले नाही. जिल्ह्यात काही ठिकाणी मच्छी ओटे बांधण्यात येतात त्याला शिफारस मत्स्य विभागाची असते. मात्र ते मच्छी ओटे त्या त्या गावात खरोखरच गरजेचे असतात का? मच्छी ओटे ज्या गावात होतात तिथे नोंदणीकृत मच्छीमार बांधव किती असतात हा संशोधनाचाच विषय असतो. 

पत्तन कार्यालयात काही पत्रकार गेल्यानंतर नेहमीच अधिकारी सांगतात सध्या आम्हाला काही विशेष काम नाही आम्हाला शासनाकडून निधी. असे असेल तर मग प्रत्येक टेबल वर काम करणाऱ्या एवढ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना पगार कसा काय चालू आहे. जर त्या विभागात काही काम नसेल तर काम नसलेल्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विभागात काम का दिले जात नाही असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.

Comments