रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम उपविभागात अधिकाऱ्यांच्या नावाची पाटी कधी लागणार, मोडक्या खुर्च्या कधी बदलणार? मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सरप्राइज व्हिजिट देऊन १०० दिवस कृती कार्यक्रमाचा आढावा घेण्याची मागणी
रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग (रत्नागिरी तालुका कार्यालय) या ठिकाणी आलेल्या नवीन अधिकाऱ्यांची नावाची पाटी अद्याप लागलेली नाही. शिवाय त्या ठिकाणी अभ्यागतांना बसण्यासाठी मोडक्या खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवस कृती आराखड्याच्या आदेशांचे जिल्हा परिषद बांधकाम उप विभागात का पालन होत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालयांना कार्यक्रम आखून देण्यात आला होता. त्या अंतर्गत अधिकाऱ्यांनी अभ्यागताना भेट मिळवून देण्यासाठी वेळ निश्चित करून द्यावयाची आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शासकीय कार्यालयाचा कारभार हा ऑनलाईन असावा असा नियम काढण्यात आला आहे. अधिकाऱ्याचे नाव आणि अधिकारी अभ्यासताना कधी भेटणार हे त्याच्या दरवाज्यावर स्पष्टपणे उल्लेखित केलेले असावे असेही धोरण आहे. अभ्यागत शासकीय कार्यालयात आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी सुयोग्य आसन व्यवस्था असावी, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी असे काही नियम आखून देण्यात आले आहेत.
मात्र रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग रत्नागिरी तालुका कार्यालय येथे अभ्यागतांना बसण्यासाठी मोडक्या खुर्च्या मांडून ठेवण्यात आले आहेत. शिवाय जे कोण नवीन अधिकारी आलेले आहेत त्यांच्या नावाची पाटी सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेली नाही. उपविभागीय अधिकारी अभ्यागतांना कधी भेटणार याच्या वेळा सुद्धा दरवाजावर लावण्यात आलेल्या नाहीत. त्या ठिकाणी शिपाई बसलेली असतात ते सुद्धा अधिकारी कुठे गेले कुठल्या वेळेला गेले कोणत्या गावात गेले काहीही माहिती देत नाही.
त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग रत्नागिरी तालुका कार्यालयाची सरप्राईज व्हिजिट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याचा आढावा घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment