नाटे येथे शाळेतून पोषण आहाराची चोरी करताना चोर रंगेहात सापडले, पण या सगळ्या प्रकरणी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी व राजापूर गटशिक्षणाधिकारी दोषी नाहीत का?
नाटे येथील शाळेमध्ये पोषण आहाराची चोरी होत असताना तिथल्या ग्रामस्थांनी चोरांना रंगेहात पकडले. आणि पोलिसांच्या हवाली केले. नाटे पोलीस ठाणे येथे त्या शाळेतील संबंधित शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यावरती गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. मात्र त्या शाळेतील पोषण आहार यासाठी वापरण्यात येणारी धान्य चोरी करण्याची हिम्मत झाली तरी कशी त्यांचे पाठीराखे कोण असा सवाल उपस्थित होत असताना रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी व राजापूर पंचायत समिती येथील शिक्षण विभाग दोषी नाही का असाही सवाल उपस्थित होत आहे.
राजापूर तालुक्यातील नाटे येथील एका विद्यामंदिरामध्ये पोषण आहारासाठी आलेल्या धान्याची चोरी करताना चोर सापडले. नाटे येथील ही शिक्षण संस्था खूप जुनी संस्था असून या शाळेतून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन अतिशय उच्च स्थानापर्यंत गेले आहेत. मात्र शाळा चालीविणारीच जर चोर धरत असतील तर भविष्यातल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी काय बोध घ्यावा असा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडून नेहमीच शाळांच्या कार्याबाबत गुणगान गायले जाते. पण ज्या शाळांमध्ये असे प्रकार होतात ते होऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या जातात त्याची कधीही माहिती पत्रकारांना दिली जात नाही. विद्यार्थ्यांनी आता चोरांकडून शिक्षण घ्यायचे का अशी चर्चा आता नाटे पंचक्रोशीत सुरू झाली आहे. सगळेच शिक्षक दोषी आहेत असे म्हणता येणार नाही. परंतु शाळांवर नियंत्रण ज्यांचे असते अशा शिक्षण विभागाचे काय?
आज ही घटना घडल्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी जिथे धान्य ठेवण्यात येते त्या ठिकाणी उंदीर असल्याचे समजले. ती जागा स्वच्छ नव्हती. विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार देण्यात येणार तो स्वच्छ असला पाहिजे ना. त्याची तपासणी करण्याचे अधिकारी जिल्हा शिक्षणाधिकारी आणि तालुका शिक्षणाधिकारी यांच्याकडे असतात. जर यांचा कारभार पारदर्शक असता तर आज ही घटना घडली नसती.
पंतप्रधान स्व. मनमोहन सिंह सरकारने शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची योजना सुरू केली. पुढे राज्यातील महायुती सरकारने योजना चालू ठेवली. पण नाटे सारख्या घटना घडत असतील तर त्याला जबाबदार कोण? विद्यार्थ्यांच्या हितासाठी पोषण आहार योजना चालू करण्यात आली होती. पण त्याचा अशा पद्धतीने गैरफायदा घेतला जात असेल तर काय? असे सवाल उपस्थित केले जात आहे.
Comments
Post a Comment