राजापूर तालिमखाना ते जवाहर चौक रस्त्यावर प्रचंड खड्डे, नागरिक हैराण, सत्ताधारी राजकारणी मात्र बघ्याच्या भूमिकेत

राजापूर शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. राजापूर तालुक्याचा आणि शहराचा हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरच प्रचंड खड्डे पडलेले आहेत. मात्र अशी परिस्थिती असताना देखील सत्ताधारी राजकारणी मात्र पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात मग्न असताना दिसून येत आहेत. तालीम खाना ते जवाहर चौक रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत असे असताना सुद्धा सत्ताधारी राजकारणी मात्र बघ्याच्या भूमिकेमध्ये आहेत की काय असा सवाल राजापूर शहर आणि तालुक्यातील ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. 

सुमारे दोन वर्षांपूर्वी राजापूर शहरातील तालीम खाना ते जवाहर चौक या रस्त्यासाठी जवळपास कोटीच्या घरात निधी खर्च करण्यात आला. त्याचे धुमधडाक्यात उद्घाटन भूमिपूजन सुद्धा करण्यात आले. मात्र आता पुन्हा या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असल्यामुळे दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या रस्त्यावरचे डांबर कोणी चोरून नेले आहे का असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये असे काही रस्ते आहेत की ते दहा दहा वीस वीस वर्षे सुद्धा टिकलेले आहेत. मात्र राजापूर शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक हा रस्ता दोन वर्षातच डांबरीकरण झाल्यानंतर पुन्हा खड्डेमय कसा काय होऊ शकतो असा सवाल उपस्थित होत आहे. 

संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे महायुतीचे सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून राजापूर जवाहर चौक ते तालीम खाना रस्त्यासाठी निधी मंजूर झाला होता. त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह सर्वच राजकीय पक्षांनी निवेदने व पत्रव्यवहार केलेली होती. हा रस्त्याला निधी मंजूर झाला आणि त्याची भूमिपूजन व उद्घाटने सुद्धा धुमधडाक्यात करण्यात आली. त्यामुळे राज्य सरकारकडून या रस्त्याच्या कामाबाबत काही चौकशी होणार का असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. 

Comments