राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी ज्या उमेदवारांनी अर्ज भरले त्यांची माहिती ठराविक वर्तमानपत्राच्या वेबसाईट न्यूज पोर्टलवर रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास कशी काय प्रसिद्ध झाली? राजापूर नगरपरिषद पत्रकार ग्रुप वरती सदर माहिती ८ वाजून ४२ मिनिटांनी पाठवण्यात आली होती.
राजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी कडून सोमवारी अर्ज भरत असताना फक्त तीन माणसांनाच केबिन मध्ये सोडण्यात येईल असे सांगण्यात आले. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार चा अर्ज देखील भरताना फक्त तीन माणसांनाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सोडण्यात आले. मात्र दुसरा आहे का राजकीय पक्षाच्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करत असताना दहापेक्षा अधिक माणसे अशी का सोडण्यात आली असा सवाल सध्या उपस्थित करण्यात येत आहे.
राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एका राजकीय पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये तीन पेक्षा अधिक माणसे गेली होती. आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी एक नियम आणि या एका ठराविक राजकीय पक्षासाठी वेगळा नियम असे कसे काय? निवडणूक आयोगाकडे याचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज असू शकते ना? निवडणूक आयोगाकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून काय कार्यवाही करण्यात येणार असा अहवाल सध्या उपस्थित करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आणि अन्य राजकीय पक्षांचे उमेदवार यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करत असताना दरवाजामध्ये अशी कुठली नोंदवही होती का त किती माणसांना आत मध्ये पाठवले, किती माणसांना
पाठवण्यात आले नाही? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये अशा प्रकारची कोणत्या प्रकारची नोंदवही आहे का? एका राजकीय पक्षाला एक नियम आणि दुसऱ्या राजकीय पक्षाला वेगळा नियम असा कुठला कायदा आहे का? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दलमध्ये शिपाई होते त्या शिपायांना विचारून जात असताना त्या ठिकाणी नोंदवही ठेवण्यात आली होती का?
त्याचप्रमाणे राजापूर नगर परिषदेच्या इमारतीमध्ये गेल्यानंतर पत्रकारांसाठी कुठल्याही प्रकारे आसन व्यवस्था करण्यात आलेली नाही? पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष किंवा माहिती देण्यासाठी कुठलीही व्यवस्था करण्यात येऊ नये असा नियम निवडणूक आयोगाने घालून दिला आहे का? सोमवारी ज्या ज्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज सादर केले त्याची सविस्तर माहिती एका ठराविक वृत्तपत्राच्या वेबसाईट न्यूज पोर्टलवर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध झाली. आणि राजापूर नगर परिषदेच्या पत्रकार व्हाट्सअप ग्रुप मध्ये सदर माहिती ८:४१ वाजता मिनिटांनी सादर झाली. म्हणजेच राजापूर नगरपरिषद प्रशासनाच्या निवडणूक विभागाकडून किंवा प्रचार प्रसिद्धी माध्यम विभागाकडून ठराविक पत्रकारांनाच लवकरात लवकर माहिती द्यावी असा कुठला नियम काढण्यात आला आहे का असा सवाल सध्या उपस्थित करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment