रत्नागिरीतील प्रभाग क्रमांक तीन उद्यम नगर पटवर्धन वाडी परिसरातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून भास्कर तथा बबन आंबेकर निवडणूक लढवणार, 78 वर्षीय आजोबांना नागरिकांचा मिळतोय प्रचंड पाठिंबा

रत्नागिरी नगर परिषदेमध्ये पूर्वीच्या काळी तब्बल 21 वर्षे नगरसेवक, चार वेळा पाणी सभापती, एक वेळा आरोग्य समिती सभापती अशी अनेक पदे सांभाळलेले भास्कर तथा बबन आंबेकर हे यावर्षीच्या रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक तीन ब मधून निवडणूक लढवणार आहेत. मधल्या सुमारे दहा वर्षांच्या काळात दुसऱ्या पक्षाची सत्ता असल्यामुळे बबन आंबेकर नगरसेवक म्हणून कार्यरत नव्हते. तरी देखील ते सामाजिक कार्य करतच होते. आता यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट मधून ते निवडणूक लढवणार आहेत. सध्या त्यांचं वय 78 असून एवढ्या वयात देखील या प्रभागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिसून येतोय. प्रभागातील अनेक प्रलंबित विकासाच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवत यावेळेस निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. 

बबन आंबेकर ज्यावेळी रत्नागिरी नगर परिषदेचे नगरसेवक होते त्यावेळी त्यांनी आपल्या प्रभागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आताच्या राजकीय परिस्थितीमध्ये, रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये येत असलेल्या उद्यम नगर, एकता मार्ग, पटवर्धन वाडी, मजगाव रोड, मिल्लत नगर, स्टेट बँक कॉलनी, आरोग्य मंदिर, मारुती मंदिर हा जो भाग येतो या भागामध्ये अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. मागील सात-आठ वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्ता असून देखील या प्रभागातील रस्ते आणि पाण्याचे प्रश्न सुटलेले नाहीत. लोक अक्षरशः वैतागलेले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील गटारांचे प्रश्न, आरोग्याशी संबंधित असलेले प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. 

त्यामुळे पुन्हा एकदा नव्या उमेदीने या प्रभागातील नागरिकांचे आरोग्याचे प्रश्न, पाणी पुरवठ्याचे प्रश्न, कचरा, घंटागाड्या यासंदर्भातील प्रश्न, शाळा, शहर बस वाहतूक आदी प्रश्न सोडवण्यासाठी आपण यावर्षीच्या निवडणुकीला उभे राहणार असल्याची माहिती भास्कर तथा बबन आंबेकर यांनी दिली आहे. 

Comments