रत्नागिरी क्रीडा संकुल परिसरातील बहुउद्देशीय हॉलचे बांधकाम पूर्ण कधी होणार?, सप्टेंबर 2023 ला या कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आला होता, सुमारे तीन कोटी रुपये एवढा निधी खर्च करण्यात येणार आहे
रत्नागिरी एमआयडीसी परिसरामध्ये असलेल्या रत्नागिरी क्रीडा संकुलाच्या परिसरामध्ये बहुउद्देशीय हॉलचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र या हॉलच्या कामाचा कालावधी पूर्ण होऊन गेला तरी अद्याप या हॉलचे हस्तांतरण क्रीडा विभागाकडे करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे काम कधी पूर्ण होणार असा सवाल सध्या उपस्थित करण्यात येत आहे.
रत्नागिरी क्रीडा संकुलाच्या परिसरामध्ये शासनाचा निधीतून सुमारे तीन कोटी रुपये एवढा निधी खर्च करून क्रीडा प्रेमींकरिता भव्य अशा बहुउद्देशीय हॉलचे उभारणी करण्यात येत आहे. सप्टेंबर 2023 मध्ये या कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. सप्टेंबर 2025 निघून गेले तरी देखील हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. 2023 मध्ये कार्यारंभ आदेश देताना त्या आदेशामध्ये काम पूर्ण करण्याचा कालावधी 24 महिने देण्यात आला होता. खरंतर 24 महिने उलटून गेले तरी देखील हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संबंधितांचे नाव मोठे लक्षण खोटे अशी काही स्थिती आहे का असाही सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.
कोट्यावधी रुपये खर्च करून हा बहुउद्देशीय हॉल रत्नागिरीच्या जनतेच्या हिताकरिता उपलब्ध होत नसेल तर एवढा निधी खर्च करून काय उपयोग? त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा कामांकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन ही कामे वेळेत का पूर्ण होत नाही याची चौकशी करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.
Comments
Post a Comment