मिरकरवाडा, मुरुगवाडा प्रभाग क्रमांक 13 ब मधून काँग्रेस पक्षाकडून इरफान होडेकर यांना उमेदवारी, महाविकास आघाडी कडून मिरकरवाडाची जागा काँग्रेस पक्षाला देण्यात आली
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक 13 ब मधून काँग्रेस पक्षाकडून इरफान होडेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून सोमवारी त्यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. रत्नागिरी शहराच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी महाविकास आघाडी झाली असून प्रभाग क्रमांक 13 ब साठी ही जागा काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात आली आहे. त्यामुळे यावेळेस या प्रभागातून काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळाली असल्यामुळे इरफान होडेकर यांना बहुतांशी नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे.
रत्नागिरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लागली असून या निवडणुकीसाठी सोमवारी बऱ्याच इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज सादर केले. महाविकास आघाडीकडून देखील उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. रत्नागिरी शहरातील मिरकर वाडा मुरुगवाडा या प्रभागासाठी खूप वर्षानंतर काँग्रेस पक्षाला जागा सोडण्यात आली आहे. त्यामुळे या प्रभागातील मूळ निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते यांना खूप आनंद झाला आहे. इरफान होडेकर यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे अनेक काँग्रेस कार्यकर्ते या प्रभागामध्ये प्रचाराला लागले आहेत.
इरफान होडेकर हे तरुण तडफदार उमेदवार काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि गेले अनेक वर्षे काँग्रेस पक्षात सक्रिय काम करत आहेत. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी रत्नागिरी शहरातील विविध प्रश्न मांडत प्रशासनाकडे निवेदन सादर करीत सामाजिक व विकासाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी प्रभागामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम देखील राबवले आहे. आणि म्हणूनच यावेळी काँग्रेस पक्षांने देखील त्यांच्या विश्वास ठेवत त्यावेळेस त्यांना निवडणुकीसाठी रिंगणात उभे केले आहे.
Comments
Post a Comment