रत्नागिरी प्रभाग 10 मधून भारतीय जनता पक्षाकडून सौ. मानसी सचिन करमरकर आणि राजेश कृष्णा तोडणकर निवडणुकीच्या रिंगणात

रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दहा मधून भारतीय जनता पक्षाकडून सौ. मानसी सचिन करमरकर आणि राजेश कृष्णा तोडकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत. आज रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी शहरातील टिळक आळी आणि गणपती मंदिर परिसर, शेरे नाका, माऊली अपार्टमेंट पर्यंत भाजपा शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला. या प्रचार फेरी मध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार राजेश कृष्णा तोडणकर, सौ मानसी सचिन करमरकर, माजी नगरसेवक श्री गंगाधर झगडे, प्रचार प्रमुख श्री मंदार सरपोतदार श्री.राजू भाटलेकर, श्री नितीन लिमये ,श्री सचिन करमरकर, श्री राजू तुपे, श्री धाक्रस काका, श्री प्रसाद दामले, श्री मंदार आंब्रे, श्री संकेत बापट, श्री.मिलिंद वैद्य, श्री.प्रणित फडके, श्री कौस्तुभ करमरकर ,श्री.अजिंक्य मुळ्ये, सौ राधा करमरकर, सौ.सायली केळकर, सौ. दुर्गा काळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments