राजापूर एसटी आगाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे सर्वसामान्य जनतेचा वैताग: शिवसेना तालुकाप्रमुख कमलाकर कदम यांची प्रतिक्रिया

राजापूर एसटी आकाराच्या नियोजन शून्य कारभारामुळे तालुक्यातील जनतेला अक्षरशः वैताग आला आहे. कुठच्याही गाड्या वेळेवर सुटत नाहीत, काही गाड्या अचानक छोट्या-मोठ्या कारणांसाठी बंद करण्यात येतात. त्यामुळे गावातील विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राजापूर एसटी आकाराच्या कारभाराबाबत रत्नागिरी विभाग नियंत्रक कार्यालयाने चौकशी करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख कमलाकर कदम यांनी केली आहे. 

राजापूर तारळ वस्तीची फेरी क्षूल्लक कारणामुळे अचानक बंद करण्यात आली. त्यामुळे या भागातील विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. असे गावागावात अनेक ठिकाणी होत आहे. राजापूर एसटी आगारातील एसटी गाड्या ह्या बऱ्याचशा गळत्या आहेत. तुटलेल्या काचा, मोडलेल्या सीट यामुळे लोकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाच्या काळात लोकांना एसटीमध्ये बसल्यानंतर छत्री उघडावी लागते की काय अशी परिस्थिती असते. आता ऐन दिवाळीच्या सीझनमध्ये तर छोट्या मोठ्या कारणांसाठी एसटी फेऱ्या बंद केल्या जातात. काही वेळेला तर राजापूर डेपोतून नियोजित वेळेत गाड्या सुटत नाही. 

त्यामुळे राजापूर एसटी आकाराच्या कारभाराबाबत रत्नागिरी जिल्हा एसटी विभाग नियंत्रक कार्यालयाने तात्काळ चौकशी करावी व राजापूर एसटी आकाराचा कारभार सुधारावा अशी मागणी कमलाकर कदम यांनी केली आहे. 

Comments