१६ ते १७ जागांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाची मागणी*
*रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी करायची असल्यास नगराध्यक्ष पदासह १६ ते १७ जागांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाची मागणी*
*16 प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज शहराध्यक्ष यांच्याकडे सादर करण्याचे पक्षाचे आदेश*
*आघाडी न झाल्यास सर्व प्रभागांमध्ये उमेदवार देण्याची तयारी: निलेश भोसले यांची माहिती*
रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने सुद्धा या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग निहाय चाचपणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवायची की स्वतंत्र निवडणूक यासंदर्भात पक्ष पातळीवर विचारविनिमय सुरू असल्याची माहिती शहराध्यक्ष निलेश भोसले यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने रत्नागिरी नगर परिषदेची जोरदार तयारी सुरू केली असून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढायची झाल्यास नगराध्यक्ष पद व 16 ते 17 नगरसेवक निवडून आणण्याची तयारी केली आहे. स्वतंत्रपणे लढायचे झाल्यास सोळा प्रभागातील 32 जागावर उमेदवार व नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा करून निवडून असा आम्हाला विश्वास आहे. लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार असून जिंकून येण्याच्या निकषावर उमेदवारी दिली जाईल. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष निलेश भोसले यांनी दिली आहे. त्यामुळे ज्या ज्या इच्छुक उमेदवारांना रत्नागिरी नगर परिषद निवडणूक लढवायची आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, पक्षाने आम्हाला त्यासाठी नियुक्त केले आहे अशी माहिती नीलेश भोसले यांनी दिली आहे.
*https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39*
*दैनिक फ्रेश न्यूज/ Regi. No. MAHMAR/2011/39536/Owner Name: Prajakta Pravin Kine/Contact:+918459886437*
Comments
Post a Comment