ॲड. हुस्नाबानू खलिफे यांच्यामुळे झाला कोंढेतडचा पूल, पूल उभारणीमुळे अनेक गावांना झाला फायदा

काँग्रेस पक्षाच्या नेत्या, माजी विधान परिषद आमदार ॲड. हुस्नाबानू खलिफे यांच्या प्रयत्नाने राजापूर शहरातील कोंढेतड येथील पूल उभारणीचा प्रश्न सुटला. राजापूर शहरातून जाणाऱ्या अर्जुना नदी मुळे शहरातील दोन प्रभाग पलीकडे गेले. राजापूर मतदार संघामध्ये अनेक आमदार खासदार होऊन गेले. परंतु कोंढे तड पूलाच्या उभारणीसाठी निधी मंजूर झाला नव्हता. लोकांना नदीपत्रातून होडीतून प्रवास करावा लागत होता. उन्हाळ्याच्या काळात अर्जुना खाडीपत्रांमध्ये छोटासा कच्चा साकव बांधण्यात येत होता. कोंढेतड भागातील लोकांना तसेच विल्ये, पडवे, डोंगर या भागातील लोकांना जुन्या हायवे वरच्या मोठ्या पुलावरून वळसा घेऊन प्रवास करावा लागत होता. किंवा होडीतून धोकादायक जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. या ठिकाणी अर्जुना नदी पात्रावर पूल उभारणी करण्यात यावी यासाठी ॲड. हुस्नाबानू खलिफे यांनी प्रयत्न सुरू केले. या पुलासाठी प्रयत्न करत असताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अर्जुना खाडी पात्रावर अगोदरच तीन पूल असल्यामुळे कोंढेतड येथे पूल उभारता येणार नाही असा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभिप्राय दिला होता. तरीही निराश न होता हा पूल बांधायचाच या दुर्दम्य आशावादाने खलिफे यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. नंतर पुलाच्या बांधणीला मान्यता मिळाली. पण निधीचा प्रश्न होता. काँग्रेस पक्षाने ॲड. हुस्नाबानू खलिफे यांना विधान परिषदेत संधी दिली. त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सौ. खलिफे यांच्या विनंती नुसार सर्वप्रथम राजापूर नगर परिषदेला एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वर्ग केला. त्यानंतर २०१४ नंतर सत्ताबदल झाला. विद्यमान आणि त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या पुलाच्या उभारणीसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यावेळी पुलाचे बजेट चार कोटी तीस लाख रुपये एवढे होते. त्यानंतर उर्वरित निधीसाठी राजापुरशी ऋणानुबंध असलेल्या त्यावेळच्या नगरविकास खात्याच्या अधिकारी श्रीमती. मनिषा म्हैसकर (भा. प्र. से.) यांनी नगरविकासाचा १ कोटी ३० लाखांचा निधी नगर परिषदेकडे वर्ग केले. त्यानंतर कोंढेतड हा पूल उभारण्यात आला. ॲड. हुस्नाबानू खलिफे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे प्रयत्न केले म्हणून या पुलासाठी निधीला मान्यता मिळाली आणि हा पूल होऊ शकला. या पूल उभारणीमुळे आता लोकांना राजापूर शहरातून थेट कोंढेतडला जाता येत आहे. तसेच गाडगीळवाडी, उन्हाळे, विलये, पडवे, डोंगर या भागातील लोकांना सुद्धा या पुलावरून जात येणे सहज शक्य झाले आहे. या भागातील लोकांना २ किलोमीटर अंतर वाचत आहे. आज हजारो लोक या पुलाचा फायदा घेत आहे. दारदरोज वाहतूक सुरू आहे. लोकांना आता होडीने जाण्याची गरज नाही. ॲड. हुस्नाबानू खलिफे यांनी त्यावेळी केलेल्या प्रयत्नामुळे आणि पूल उभारणी झाल्यामुळे राजापूर शहरातील नागरिकांमधून, कोंढेतड नागरिकांमधून, तालुक्यातून आभार व्यक्त केले जात आहेत. 

Comments