राजीवडा येथील जकी खान यांनी राबवली होती रक्तदान शिबिरे, रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी जनतेचा पूर्ण पाठिंबा
रत्नागिरी शहरातील राजिवडा प्रभागातील युवा सामाजिक कार्यकर्ते जकी खान यांनी अनेक वेळा रत्नागिरी शहरातील नागरिकांच्या करिता आरोग्य शिबिरे आयोजित केली होती. अनेक वेगळा रक्तदान शिबिर सुद्धा संपन्न केली होती. एका रक्तदान शिबिरात तर 204 लोकांनी सहभाग घेऊन रक्तदान केले होते. अशा या आरोग्य सेवकाला रत्नागिरी नगर परिषदेत पाठवण्यासाठी राजीवडा प्रभागातील जनता सज्ज झाली असल्याचे बोलले जात आहे. यावर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जकी खान यांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी या भागातील जनता मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत असल्याचे बोलले जात आहे.
यावर्षी रत्नागिरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राजीवडा प्रभागातील युवा सामाजिक कार्यकर्ते जकी खान हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. जकी खान हे निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे समजल्यानंतर या परिसरातील तसेच शहरातील विविध भागातील युवकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. जकी खान यांनी मागील पाच ते सहा वर्षात अनेक सामाजिक उपक्रम राबवले. गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून येणारी जकी खान लोकांना आजही आठवतात. म्हणूनच यावर्षीचा रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवारी घ्यावी निश्चितच त्यांना भरघोस मतदान मिळेल असा निर्धार केला असल्याचे या भागातील त्यांच्या समर्थकांमधून सांगण्यात येत आहे.
Comments
Post a Comment