गुहागर तालुका बार असोशिएशनच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध

गुहागर : 
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई
यांच्यावर न्यायालयात झालेल्या भ्याड हल्ल्याचा गुहागर तालुका बार असोशिएशनच्या वतीने मंगळवारी जाहिर निषेध करण्यात आला. गुहागर न्यायालयाच्या बाहेर प्रवेशद्वारावर गुहागर तालुका बार असोशिएशनच्या वतीने या कृत्याचा जाहिर निषेध करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात बुट फेकण्याचा दुदैवी प्रकार सोमवारी घडला. याचे तीव्र पडसात देशभरात उमटले आहेत. या कृत्याचा सर्वत्र जाहिर निषेध केला जात आहे. गुहागर तालुका बार असोशिएशनच्या वतीने मंगळवारी गुहागर न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर एकत्रित येत सर्व वकिलांनी या कृत्याचा जाहिर निषेध केला. गुहागर तालुका बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. संकेत साळवी यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येत बार कौन्सीलने या भ्याड हल्त्याचा जाहिर निषेध केला.

याप्रसंगी बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. संकेत साळवी, ॲड. दिनेश विचारे, ॲड. मयुरेश पावस्कर, ॲड. आदित्य भावे, ॲड. अमृता मोरे, ॲड. प्रमेय आर्यमाने, ॲड. मानसी सोमण, ॲड. अक्षता कदम, ॲड. गाडगीळ, ॲड. राजेश जाधव, ॲड. दिनेश कदम, ॲड. मनाली आरेकर, ॲड. मयुरेश कानसे आदी वकील उपस्थित होते.

Comments