आपणच मालक आपला आवाज पोहचवूया आपल्या सेवका पर्यंत .. भेट द्या आणि तुमची तक्रार घेऊन आपण एकीने सोडवूया .. चला सत्याग्रह करूया !!!
विषय: अन्यायाविरुद्ध सुरू असलेल्या संविधाननिष्ठ सत्याग्रहाला आवाज द्यावा — एक नम्र विनंती.
24 - 10- 2025
मारुती मंदिर
प्रश्न सुटेपर्यंत
## 🗣 *लोकहित निवेदन – नागरिकांचा आवाज*
*प्रविण किणे*
यशोदा अपार्टमेंट, ब विंग, एकता मार्ग, मारुती मंदिर, रत्नागिरी.
7020843099
jantamalikindia@gmail.com
---
### विषय: जनतेच्या मूलभूत गरजा, भ्रष्टाचार व प्रशासनातील अन्याय याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी
---
*मागण्या व मुद्दे *
1. सिव्हिलमध्ये एम.आर.आय. साठी ₹७५०० द्यावे लागतात. सिव्हिलमध्ये एम.आर.आय. मशीन त्वरित पाहिजे.
2. नगरपालिका हॉस्पिटल मिश्राला भाड्याने दिले आहे ते रद्द करून नरेंद्र महाराज यांना पण संधी द्या; त्यांनी मोफत सेवेसाठी द्या. संपूर्ण मोफत आरोग्य सेवा पाहिजे.
3. पोलिस राजकीय दबावाखाली काम करतात. सर्वांच्या तक्रारी घ्या. न्याय द्या.
4. प्रविण किणे यांच्यावर राजकीय हेतूने केलेली FIR रद्द करा.
5. नागरिक तक्रार करतात त्याची दखल घ्या.
6. संसारे गार्डन येथील वडाचे व इतर झाडे व मारुती मंदिर ते रेल्वे स्टेशन ची दुतर्फा झाडे तोडणारे बिल्डर नवकार, सिद्धिविनायक, के.एस.पी., ओसवाल, साळवी यांच्यावर कारवाई करा.
7. खोटे रस्ता, मुंबई-गोवा हायवे, खोटी घरे भरपाई, रुंदीकरण पंचनामे रद्द करा व जिल्हाधिकारी, प्रांत, तलाठी यांची चौकशी करा.
8. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, एसपी यांची संपत्ती जाहीर करा.
9. 45 वर्षे मारुती मंदिर ते समुद्रपर्यंतची गटार अपूर्ण आहे, तिचे काम सुरू करा.
10. विलंब का केला, रस्ते व खोटी आश्वासण देणाऱ्यांवर कारवाई करा.
11. आरटीओ हप्तेखोरी बंद करा, ट्राफिक पोलिस लोकांना त्रास देतात तो त्वरित थांबवा.
12. सर्व शासकीय सेवा व आरटीओ मध्ये त्वरीत मोफत मार्गदर्शन कक्ष सुरू करा.
13. सरकारी शाळेत 5 वी ते 8 वी मुलांना लिहिता वाचता येत नाही, खोटे साक्षरता अभियान यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कारवाई करा.
14. जिल्ह्यातील व मॅस कंपनीवर प्रदूषणाबाबत कारवाई करा.
15. लाच घेताना सापडलेले शिक्षण अधिकारी लोहार, बळवंतराव यांचा चार्ज त्वरित काढून घ्या.
16. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे लाच घेण्यासाठी नेमलेले वर्षानुवर्षे अनधिकृत पीए सावंत, दिनेश सिनकर यांना त्यांच्या जागेवर पाठवा.
17. परीक्षित यादव, आरटीओ ताम्हणकर, सर्व इंजिनियर यांची मालमत्ता चौकशी करा व वर्षानुवर्षे तेथेच असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करा व माहिती द्या.
18. सर्व जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत, नगरपालिका यांनी खर्च केलेले निधी, करार, निविदा, पूर्णत्व दाखले सार्वजनिक बोर्डावर जाहीर करा.
19. रेल्वे व एसटी मध्ये प्रत्येक प्रवाशाला बसायला जागा मिळाली पाहिजे. त्वरित निर्णय घ्या.
20. सर्व समुद्रकिनारी जागा स्थानिकांना ₹१ भाड्याने द्या.
21. कोकणातील कंपन्यांमध्ये किती स्थानिक आहेत हे जाहीर करा.
22. कोकणातील आजी-माजी आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांची मालमत्ता जाहीर करा.
23. आमदार व खासदार यांना रोड व खराब कामाबद्दल जबाबदार धरा.
24. नगरपालिकेचे गाळे कोणी घेतले व कोण चालवते ते जाहीर करा.
25. पार्टनरशिपमध्ये असेल तर इन्कम टॅक्स व आयटीआरमधील प्रॉफिट-लॉस नोंदी दाखवा, नाहीतर बेरोजगारांना सेम रेटमध्ये गाळे द्या.
26. सेक्स रॅकेटमधील सहभागी ग्राहक व आतापर्यंतच्या पोस्कोचे आरोप असलेल्यांची यादी द्या.
27. वाळू, खाण, क्रशर यांची इलेक्ट्रॉनिक मोजणी करा.
28. कायद्यानुसार सीसीटीव्ही, प्रदूषण दाखले व रॉयल्टी भरल्याचे पुरावे द्या.
29. रॉयल्टी, डांबर व कामाची बिले सार्वजनिक करा.
30. विमानतळ प्राधिकरणाने अटीवर दिलेल्या परवान्यांत अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून सर्व बोगस बिल्डिंग परवाने रद्द करा.
31. नगरसेवकांचे गाळे व घरे जाहीर करा.
32. शिक्षक व सरकारी अधिकारी यांना जिओ लोकेशन ट्रॅकिंग लागू करून सार्वजनिक करा.
33. शिक्षकांना लागणारी शिकवणे सोडून सर्व गैरशैक्षणिक कामे रद्द करा व शिक्षण गुणवत्तेबाबत जबाबदार धरा.
34. शासननिर्णयानुसार अनधिकृत एसपी, सीओ व सर्व अधिकारी यांच्या केबिनमधील एसी बंद करा व त्याची बिले वसुल करा.
35. बँकेत कोरोना पूर्वीचा सिबिल ग्राह्य धरा.
36. उद्योजकांना सबसिडी व सर्व योजनांसाठी एक खिडकी योजना सुरू करा.
---
### * मागणी*
> “संपूर्ण कोकणात पारदर्शक, नि:स्वार्थ, मोफत आणि न्याय्य प्रशासन हवे आहे. अन्याय करणारेच नव्हे, तर अन्याय सहन करणारेही जबाबदार आहेत. नागरिकांना न्याय, पारदर्शकता आणि संधी — हे शासनाचे कर्तव्य आहे.”
*– प्रविण किणे, नागरिक *
---
सप्रेम नमस्कार.
मी, प्रविण किणे, रत्नागिरी येथे राहणारा एक सामान्य नागरिक, गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनातील भ्रष्टाचार, दिरंगाई आणि अन्यायाविरुद्ध न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करीत आहे.
२०१४ पासून विविध स्तरांवर मी अर्ज, तक्रारी, निवेदने दिली — पण प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही.
माझ्या आवाजाला फक्त “प्रलंबित” आणि “प्रलंबित” अशी उत्तरं मिळाली, न्याय नाही.
१५ ऑगस्ट २०२५ रोजी मी रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्या वेळी प्रशासनाने मला काही आश्वासने दिली, पण आजपर्यंत एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही.
उलट, प्रश्न विचारल्यावर मला खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी, दबाव आणि दुर्लक्ष मिळाले.
मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, कोणतीही वैयक्तिक शत्रुता नाही — पण सत्य, प्रामाणिकपणा आणि न्याय यासाठी मी हा लढा लढत आहे.
त्या पार्श्वभूमीवर मी दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ पासून, मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर आम्रवृक्षाखाली, लक्षवेधी उपोषण सुरू करीत आहे.
हे आंदोलन पूर्णपणे संविधाननिष्ठ, शांततामय व गांधीवादी मार्गाने होणार आहे.
माझा आवाज प्रशासनाने दाबला, पण मला विश्वास आहे की माध्यमे म्हणजे समाजाचे आरसे आहेत — आणि सत्याला आवाज देण्याची ताकद केवळ पत्रकारितेकडे आहे.
मी आपल्याला नम्र विनंती करतो की,
👉 माझ्या या सत्याग्रहाचा हेतू, पार्श्वभूमी व प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाचा आवाज आपल्या वृत्तपत्र, पोर्टल किंवा न्यूज चॅनलमधून समाजासमोर पोहोचवावा.
👉 कारण हा लढा केवळ माझ्यासाठी नाही — तर त्या प्रत्येक सामान्य नागरिकासाठी आहे, जो अन्याय सहन करत आहे पण आवाज उठवण्यास घाबरतो.
आपल्याकडून एक बातमी, एक शीर्षक, एक ओळ माझ्यासाठी नाही — तर जनतेच्या न्यायाच्या हक्कासाठी असेल.
आपले माध्यम हा जनतेचा आधार आहे, आणि आज त्या आधाराची मला गरज आहे.
धन्यवाद.
आपला नम्र,
प्रविण किणे
यशोदा अपार्टमेंट, 205 ‘ब’ विंग,
एकता मार्ग, मारुती मंदिर, रत्नागिरी – 415612
📞 7020843099
दिनांक: २२ ऑक्टोबर २०२५

Comments
Post a Comment