राजापुरात आलेल्या १६ शिक्षकांच्या कार्यमुक्तीच्या ऑर्डर पुन्हा रद्द?, तालुक्यात शिक्षक कमी असतानाही या शिक्षकांना आता परत मूळ शाळेत पाठवणार? नेमका दबाव कुणाचा आला?

जिल्हांतर्गत बदलांच्या अंतर्गत राजापूर तालुक्यात 16 शिक्षक आले होते. लांजा रत्नागिरी तालुक्यातून शिक्षकांच्या राजापूर तालुक्यात बदल्या करण्यात आल्या होत्या. शिक्षक बदली टप्पा क्रमांक सात अंतर्गत अथवा सातव्या टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. कुणाच्यातरी दबावापोटी या 16 शिक्षकांच्या बदल्या थांबवण्यात आल्या असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. 

राजापूर तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये जवळपास 200 शिक्षकांची रिक्त पदे आहे. त्याचप्रमाणे विस्तार अधिकाऱ्यांची पदे देखील रिक्त आहे. राजापूर तालुक्यात सुमारे दहा ते बारा शून्य शिक्षकी शाळा आहेत. अशा परिस्थितीत 16 शिक्षक मिळणे म्हणजे प्रशासनासाठी आणि शाळा चालवण्यासाठी खूप मोठी बाब होती. सातव्या टप्प्यातील आंतरजिल्हा शिक्षक बदली अंतर्गत रत्नागिरी लांजा परिसरातील काही शिक्षकांच्या राजापूर तालुक्यात बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र राजकीय दबावापोटी या बदलीचे आदेश स्थगित करून कार्यमुक्तीचे आदेश रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. प्रत्येक वेळी राजापूर तालुक्यावरच असा प्रकारे अन्याय का केला जातो असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. 

Comments