राजापुरातील फेरीवाल्यांकडे असलेल्या विनापरवाना एम ८० गाड्यांवर राजापूर पोलीस प्रशासन आणि वाहतूक पोलीस कारवाई का करत नाहित? राजापूरकरांचा सवाल

राजापूर तालुक्यातील गावागावात फिरत असणाऱ्या फेरीवाल्यांकडे जुन्या झालेल्या एम ८० दुचाकी गाड्या दररोज हे लोक चालवत असतात. मात्र राजापूर पोलीस प्रशासन आणि रत्नागिरी जिल्ह्यातील वाहतूक पोलीस प्रशासन यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नाही. पोलीस नियमित राजापूर जवाहर चौक, जकात नाका, ओणी, पाचल या भागामध्ये सर्वसामान्य लोकांवर कारवाई करतात. लोकांकडे लायसन नसेल, हेल्मेट नसेल, इन्शुरन्स पियूसी काढलेली नसेल तरी देखील पोलीस कारवाई करतात. मात्र फेरीवालांकडे ज्या गाड्या आहेत त्यांच्याकडे ना परवाना इन्शुरन्स ना पीयूसी काहीच नसते. मात्र पोलिसांकडून या फेरीवाल्यांच्या गाड्यांवर कारवाई केली जात नाही. आपल्या हातातील गाड्या बेदरकारपणे चालवत असतात आणि सगळेच्या सगळे गोळा केलेले भंगार राजापुरात आणून टाकतात. अवजड वाहतूक चार चाकी पाच चाकी किंवा सहा चाकी गाड्या मधूनच होते असे नाही अवजड वाहतूक दुचाकी वाहनांवरून देखील होऊ शकते. मात्र पोलिसांकडून आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या फेरीवाल्यांकडे असलेल्या वाहनांची सखोल तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जनतेमधून करण्यात येत आहे. 

Comments