रत्नागिरी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची केवळ दोन महिन्यातच शिक्षण उपसंचालक पुणे येथे प्रमोशनने बदली?, असे होते तर मग दोन महिन्यासाठी रत्नागिरीकडे पदभार का दिला? जनतेचा सवाल
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची पुणे येथे शिक्षण उपसंचालक म्हणून प्रमोशनंनी बदली झाल्याची माहिती मिळत आहे. विद्यमान शिक्षणाधिकारी यांची रत्नागिरी येथे दोन महिने पूर्ण होतात ना होतात तोपर्यंत त्यांची उपसंचालक म्हणून प्रमोशनंनी बदली होते. असे होतेच तर मग शासनाने दोन महिन्यांसाठीच रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे बदली का केली असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. माध्यमिक शिक्षण विभागाकडे पूर्णवेळ शिक्षणाधिकारी असताना सुद्धा त्यांची बदली करण्यात आली. नंतर बदलीने दुसरा शिक्षणाधिकाऱ्यांची रत्नागिरीला बदली करण्यात आली. या शिक्षणाधिकाऱ्यांची आता पुन्हा उपसंचालक म्हणून प्रमोशन होऊन पुणे येथे बदली करण्यात आली आहे. शासनाचे नेमके प्रमोशन करण्याचे, करण्याचे नेमके नियम काय आहेत हे जनतेला कळले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की 100 दिवसाच्या कृती आराखड्यांतर्गत सर्व विभागांचा कारभार ऑनलाईन पद्धतीने चालला पाहिजे. मग बदल्या आणि प्रमोशन हे जे काय प्रकार सुरू आहेत ते ऑनलाईन पद्धतीने असतात की नसतात? बदल्या कधी झाल्या आणि प्रमोशन कधी झालं हे जनतेला कळायला नको का? कोणत्या कारणामुळे प्रमोशन होतात? कोणत्या कारणामुळे बदल्या होतात? कोणत्या कारणामुळे विनंती बदल्या केल्या जातात? कोणत्या कारणामुळे प्रतिनियुक्त दिल्या जातात? कोणत्या कारणामुळे आणि किती दिवसांसाठी प्रति नियुक्त दिल्या जातात? ही सर्व माहिती जनतेपासून का लपवली जाते? या सगळ्या प्रक्रिया रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर का दिसत नाही? पारदर्शक कारभार असेल तर मग कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रमोशन आणि प्रतीनियुक्त्या वेबसाईटवर का दिसत नाही असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे?
Comments
Post a Comment