राजापूर जवाहर चौक बाजारपेठ - मच्छीमार्केट रस्त्याला २० वर्षे झाली तरी एकही खड्डा पडलेला नाही, ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी केलेली विकासकामे राजापूरवासीयांच्या कायम स्मरणात राहतील
काँग्रेस पक्ष म्हणजेच विकास हे जणू काही समीकरणच आहे. राजापूरचा विकास म्हणजे प्रथम नाव घेतले जाते ते खलिफे परिवाराचे. राजापूर जवाहर चौक बाजारपेठ ते मच्छीमार्केट रस्ता २००४ साली ॲड. हुस्नबानू खलिफे नगराध्यक्ष असताना काँक्रिट रस्ता करण्यात आला. आज पर्यंत या रस्त्यावर एकही खड्डा पडलेला नाही. तब्बल वीस वर्षे झाली तरी देखील हा रस्ता आज पर्यंत जशास तसा आहे. काँग्रेस नेत्या, माजी विधान परिषदेच्या आमदार ॲड. हुस्नाबानू खलिफे यांनी केलेली विकास कामे राजापूरच्या नागरिकांच्या कायम स्मरणात राहतील.
उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे तात्कालीन अध्यक्ष, त्यावेळचे आमदार उल्हास दादा पवार यांनी ॲड. हुस्नाबानू खलिफे यांच्या विनंतीनुसार 2004 साली सुमारे 14 लाख रुपये एवढा निधी राजापूर नगर परिषदेला जवाहर चौक बाजारपेठ ते मच्छीमार्केट रस्ता या रस्त्यासाठी मंजूर केला. सुरुवातीला हा रस्ता गैरसोयीचा आणि खाच खळग्यांचा होता. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम करत असताना बाजारपेठेतील व्यापारांना त्रास होणार होता. तथापि त्यावेळच्या नगराध्यक्ष असलेल्या ॲड. हुस्नाबानू खलिफे यांनी व्यापारी वर्गाशी बैठक घेऊन त्यांची संमती मिळवली. त्यावेळी काम सुरू झाल्यानंतर वेळप्रसंगी व्यापारी वर्गाने काही वेळे करता आपली दुकाने बंद करत नगरपरिषदेला चांगले सहकार्य देखील केले होते. सदर रस्त्याचे काम कोल्हापूर येथील पाटील नामक कंत्राटदाराने केले. रस्त्याचे काम दर्जेदार व्हावी यासाठी राजापूर नगर परिषदेचे त्यावेळी चे पदाधिकारी व प्रशासनाने चांगली देखरेख ठेवली होती. त्यावेळी बहुतेक दुकानांच्या पायऱ्या रस्त्यावर आलेल्या होत्या परंतु व्यापारी वर्गाने त्या मोकळ्या करून दिल्या. यामागचा उद्देश एकच होता की वेळेप्रसंगी आवश्यकता बसल्यास नगर परिषदेचा अग्निशामक बंब बाजारपेठेत आणता यावा. ही गरज लक्षात घेऊन सदर रस्त्याचे काम करण्यात आले.
ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या जवाहर चौक बाजारपेठ ते मच्छीमार्केट रस्ता वीस वर्षे झाली तरी देखील एकही खड्डा पडलेला नाही. आजही संपूर्ण बाजारपेठेतील लोक ॲड. हुस्नबानू खलिफे यांचे या कामाप्रती कौतुक केले जात आहे. काँग्रेस म्हणजेच विकास हे एक वेगळेच समीकरण राजापूर शहरात झालेले आहे. हे असे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. ॲड. हुस्नबानू खलिफे व त्यानंतर ॲड. जमीर खलिफे यांनी केलेले विकास कामे राजापूर शहरातील नागरिक विसरलेले नाहीत.
Comments
Post a Comment