रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी मतदान केंद्र असलेल्या दामले विद्यालयाची केली पाहणी

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक -2025 च्या अनुषंगाने रत्नागिरी नगर परिषद प्रभाग क्रमांक 7 मधील नगरपरिषद शाळा क्र.15 (दामले विद्यालय) येथे प्रस्तावित मतदान केंद्रांची किमान आवश्यक मूलभूत सुविधांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडून पाहणी करण्यात आली. आगामी रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दामले विद्यालयाला भेट दिली.

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा सह आयुक्त श्री तुषार बाबर, अधीक्षक न.पा.प्र.श्री प्रविण माने, नगरपरिषद अभियंता श्री यतिराज जाधव, वाहन विभाग प्रमुख श्री जितेंद्र विचारे आदी उपस्थित होते.

Comments