रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश अधिकारी रजेवर, चक्रीवादळ, त्सुनामी अशी कोणती आपत्ती आल्यास त्या आपत्तीचे निवारण कोण करणार?
रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी अधिकारी आज रजेवर गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात वादळ, त्सुनामी अशी कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यास त्याला जबाबदार कोण? जिल्हाधिकारी आपत्तीचे निवारण कसे करतील असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. आज शुक्रवारी २४ ऑक्टोबर रोजी बहुतांशी प्रमुख अधिकारी रजेवर गेले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील आपत्ती विभागातील प्रमुख अधिकारी, एस टी महामंडळ, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, तालुका कृषी अधीक्षक कार्यालय, महाराष्ट्र मेरीताइम बोर्ड, पत्तन विभाग या विभागातील प्रमुख अधिकारी रजेवर गेले आहेत. त्याशिवाय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम विभाग चिपळूण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कृषी अधिकारी आदी विभागातील बहुतांशी अधिकारी रजेवर गेले आहेत.
विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी १०० दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला. त्याला काही नियमावली घालून दिली आहे. मात्र रजेवर गेलेल्या एकाही अधिकाऱ्याच्या दरवाजावर अधिकारी रजेवर गेल्याची माहिती प्रदर्शित करण्यात आलेली नाही. तसंच ऑनलाइन वेबसाइटवर सुद्धा रजेवर गेल्याची माहिती आणि त्याचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच म्हणतात की आमच्या सरकारचा पारदर्शक कारभार चालू आहे. पण आज शुक्रवारी एकही रजेवर गेलेल्या अधिकाऱ्याने १०० दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत नियम पाळले नाहीत. त्याबाबत आता त्यांच्यावर काही कारवाई होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Comments
Post a Comment