रत्नागिरी शहरात भाजपचेच पारडे जड, वर्षाताई ढेकणे यांच्यासह भाजपमध्ये अनेक जण इच्छुक, तर काँग्रेस राष्ट्रवादी मध्ये सुद्धा अनेकांची मोठी यादी

रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे पारडे जड असल्याचे सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षामध्ये वर्षाताई ढेकणे यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत. रत्नागिरी शहरामध्ये भारतीय जनता पक्ष या पक्षाच्या व्यतिरिक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या पक्षात देखील काही महत्त्वाच्या प्रभागांमधून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मोठी यादी तयार झाली असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. त्यामुळे काही सत्ताधारी पक्षांमध्ये बेचैनीचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. 

रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी एक जागा थेट नगराध्यक्ष पदासाठी तसेच सोळा प्रभागांमधून 32 नगरसेवक निवडून आणायचे आहेत. त्या साठी शहरातील अंतिम प्रभाग रचना त्याचप्रमाणे आरक्षण सोडत देखील जाहीर झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडले आहे. नगराध्यक्ष पदासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये पुरुष उमेदवार यांची खूप मोठी नावे समोर येत होती. मात्र महिला आरक्षण पडल्यामुळे अनेक जण नाराज झाले. 

परंतु भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या तीन पक्षांमध्ये मोठे चेहरे समोर येत आहेत. भाजपामध्ये वर्षाताई ढेकणे यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. रत्नागिरी शहरांमध्ये बऱ्याचश्या प्रभागांमध्ये मध्यमवर्गीय, नोकरदार वर्ग राहत असल्याने हा वर्ग भारतीय जनता पक्षाला प्रथम पसंती देतो. परंतु मागे झालेला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा कमी मतदान झाले. 

परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकीकडे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक एकीकडे त्यामुळे रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीमध्ये काही वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. रत्नागिरी शहरातील लोक रस्त्यावरचे खड्डे, जानेवारी ते मी या दरम्यान होत असलेला वेळी अवेळी होत असलेला पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, खेळाडूंसाठी चांगले मैदान नसणे, गटारांची सुयोग्य व्यवस्था नाही, मोकाट गुरे, कुत्री यांचे प्रश्न यामुळे लोक आता कंटाळले आहेत. लोकांना आता शाश्वत विकास हवा आहे. त्यामुळे यावर्षीच्या राजकारणात कोण कोण नवखे उमेदवार असतील आणि कोण कोण तेच तेच उमेदवार असतील ते येणाऱ्या काही दिवसातच समजणार आहे. आगे आगे देखो होता है क्या....

Comments