रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत महा विकास आघाडीचाच उमेदवार निवडून आणायचा आहे: बाळ माने

रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अशा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील महाविकास आघाडी मधून निवडून आणायचा आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरातल्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे असे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते व रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाळ माने यांनी शिवसैनिकांना केले आहे. 
नुकतीच माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी बाळ माने यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. रत्नागिरी शहरातील प्रमुख प्रश्न घेऊन आपल्या सर्वांना नगरपालिका निवडणुकीमध्ये उतरायचे आहे. शिवसेना पक्ष म्हणून आतापर्यंत आपण काय काय कामे केली ते आता आपल्याला जनतेसमोर मांडायचे आहे. आणि या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनतेचा देखील आपल्याला चांगला पाठिंबा मिळणार आहे असे ठाम मत बाळ माने यांनी व्यक्त केले. 

Comments