रत्नागिरी:महाराष्ट्र काँग्रेस च्या आमदार , खासदार , यांनी शेतकर्‍यांसाठी सहा महिन्याचा पगार, मानधन द्यावे - अशोकराव जाधव

रत्नागिरी:महाराष्ट्र काँग्रेस च्या आमदार , खासदार , यांनी शेतकर्‍यांसाठी सहा महिन्याचा पगार, मानधन द्यावे - अशोकराव जाधव काँग्रेसचे जेष्ठ नेते यांचे आवाहन
 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी , आमदार, खासदार, माजी आमदार , माजी खासदार यांना जाहिर विनंती .
मा . आम .विजय वडट्टीवार प्रतोद विधानसभा महाराष्ट्र यानी अतीवृष्टी आणि महापुर नुकसान ग्रस्थ शेतकरी यांना मदत मिळावी म्हणून सहा महिन्याचा पगार , मानधन घेणार नसले चे सांगून सदर पगार ' मानधनाची रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देवू केलीआहे ही काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आम्हास आणि काँग्रेस कार्यकर्तांना अभिमानाची गोष्ट आहे. अगदी याच प्रमाणे महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषेदेतील आमदारांनी ही आपला सहा महिन्याचा पगार आणि मानधन पुरग्रस्थ आणि नुकसान ग्रस्थांना द्यावा तसेच काँग्रेसच्या सर्व माजी मंत्री , माजी खासदार, लोकसभा, राज्यसभा , माजी आमदार विधान सभा, विधान परिषद, यानीही सहा महिन्याची पेन्शन निधी म्हणून द्यावी अशी आम्ही काँग्रेस कार्यकर्त नम्रता पुर्वक विनंती करीत आहोत . असे काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोकराव जाधव माजी अध्यक्ष सामाजिक न्याय
 विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस . आणि अध्यक्ष शेतकरी - कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य यानी आवाहन केले आहे . यावेळी अशोकराव जाधव यांचे नेतृत्वा खाली ठराव झाला तेंव्हा दिपक राऊत, महादेव चव्हाण, बशिर मुजावर, अशोक पवार , विश्वनाथ किल्लेदार , इलियास मापारी , रजनिकांत लिंगायत, प्रफुल्ल वडके, अनंत धामणे , विलास कदम, विश्वास करंबळे , पर्शराम, पांडूरंग घोरपडे, सुनिल पवार, ओंकार घाग, दिनेश खातू . पटवर्धन, सौरभ झोरे इत्यादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते सदर ठराव मा . हर्षवर्धन सपकाळ अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांना पाठवून त्यांनी सहा महिन्याचा पगार, मानधन आमदार, माजी आमदार , खासदार, माजी खासदार यांना पुरग्रस्थ आणि नुकसान ग्रस्थांसाठी निधी देणेचे आदेश करावेत ही विनंती प्रदेश अध्यक्षांना ठरावाद्वारे करण्यात आली आहे .
आपला - अशोकराव जाधव . माजी अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस .
संस्थापक अध्यक्ष शेतकरी कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य . दि .2 ऑक्टोंबर 2025 .

Comments