साहित्य सहवास

एक दिवा लावावा म्हणतो त्यांच्या काळजात, ज्यांचं काही जळत नाही
देश माझा..
पण देशासाठी काही करावं यांना वाटत नाही..
लावावा म्हणतोय एक फटाका त्यांच्याही घरात ...भ्रष्टाचार मारामारी ..अत्याचार...ज्यांना दिसत नाहीत...
प्रिय फक्त आपले घर...
तिथे दीपावली मध्ये सैनिक का जाळतो आहे आपले रक्त..बर्फ गोठून बॉर्डरवर 

माझ्यासारखा वेडा..
उठेल या काळोखात ..
एकदा पेटवू या एक  दीपज्योत तुमच्या काळजात ...




प्रविण किणे 
लेखक, कवी...

“का कोणी बोलत नाही?”

खराब रस्ते, तुटलेली हॉस्पिटलं,
बेरोजगारीचे रांगेत उभे स्वप्न…
पण तरीही शांतता ठाम आहे,
जणू सगळं काही सुरळीत चाललं आहे.

चांगल्या माणसांना हे सगळं ठाऊक आहे,
पण त्यांच्या सुशिक्षित शांततेनेच
हा अन्याय श्वास घेत जगतो आहे.

का कोणी बोलत नाही?
स्वार्थापुढे विश्व नाही…
आपलं घर, आपली नोकरी, आपला आराम —
यापलीकडे त्यांना काही दिसतच नाही.

यांची मुलं लिहितात निबंध,
“देशभक्ती”वर देतात भाषण,
“भारत माता की जय” ओरडतात,
आणि मग त्याच राजकारण्यांना
फुलांच्या हारात देतात दुषणे.

खरं तर दोष रस्त्यांचा कमी,
आणि आपल्या शांततेचा जास्त आहे,
कारण आवाज दाबला कीच
अंधार जगण्याची सवय बनतो आहे.

कोणीच काही बोलत नाही,
कारण सत्य बोलण्यासाठी
धैर्य लागतं, स्वार्थ नव्हे.
आणि आज धैर्य विकलं जातं,
तिथेच तर स्वार्थ फुलतं आहे.


---
https://chat.whatsapp.com/LONrsGYBeAG9i89zhJNaUe?mode=ems_copy_t

Comments