अप्पर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतीला निवेदन,सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्यावर कारवाई करा

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतीला निवेदन,
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्यावर कारवाई करा

By -दिपक चुनारकर(गडचिरोली)
    सहा ऑक्टोबर 2025 रोजी देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोर तिवारी या जातीवाद समाजकंटकाने बूट फेकल्याने आमच्या भावना दुखावल्या असून त्या घटनेच्या जाहीर निषेध असून त्याच्यावर तात्काळ कठोरातील कठोर शिक्षा करून त्यांनी जाहीर माफी मागावी. करिता आलापल्ली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व संघमित्रा बुद्ध विहाराच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी अहेरी मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन दिले आहे
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावरील बूट फेकण्याचा प्रकाराने देशातील वातावरण ढवळून निघाले असून उलट राकेश किशोर तिवारी हे घटनेचे दिलगिरी व प्रायश्चित न करता सर्वरत प्रसार माध्यमांमध्ये वापरत आहेत.
    असले प्रकार आम्ही कदापी खपवून घेणार नाही. तात्काळ जातीवाद समाजकंटक राकेश किशोर तिवारी याच्यावर कठोर शिक्षा करून त्यांनी जाहीर माफी मागावी करिता आपल्या मार्फतीने देशाचे महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात येत आहे
निवेदन देताना वामन भगत, कार्तिक निमसरकार, दामोदर राऊत, देविदास वाघमारे, भीमराव झाडे, प्राचार्य विष्णू सोनोणे, दादाजी फुलझले, जयंत गजभिये, मेश्राम सर, सुनील खोब्रागडे, रवींद्र बारशिंगे , घनश्याम घागरगुंडे, संजय कोंडागुरले गिरीश खोब्रागडे, ओमसाई कोंडागुरला व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Comments