रत्नागिरीतील त्या दुचाकी शो रुमची नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून पाहणी, अग्निशमन यंत्रणा नसल्याने नोटीस बजावणार

रत्नागिरीतील त्या तथाकथित दुचाकी शोरूम ची रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली असून त्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा नसल्याने सदर दुचाकी मालकाला नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सदर दुचाकी शोरूम चे नाव मोठे आणि लक्षण खोटे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

रत्नागिरीतील एका टू व्हीलर शोरूम ला अग्निशमन यंत्रणा बसवली नसल्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला होता. या टू व्हीलर शोरूम च ठिकाणी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मोठमोठ्या जाहिराती देण्यात आल्या होत्या. जाहिरातींची जणूकाही आतिषबाजी करण्यात आली होती. मात्र एवढ्या मोठ्या शोरूम ला अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आलेली नाही. 

राजापूर तालुक्यातील नाटे येथे एका व्यापारी संकुलाला शॉर्टसर्किटने आग लागून त्या ठिकाणच्या दुकानदारांचे फार मोठे नुकसान झाले होते ही घटना मे, जून 2025 च्या दरम्यान घडली होती. रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना मागील काही वर्षांमध्ये घडल्या आहेत. मात्र या घटनांच्या बातम्या पाहून सुद्धा काही वाहन विक्रेते शोरूम मालकांना जागरूकता आलेली दिसून येत नाही. रत्नागिरीतील अशाच एका टू व्हीलर शोरूम व सर्विस सेंटर च्या ठिकाणी अनेक लोक येतात अनेक ग्राहक येतात त्यामुळे नाटेसारखी दुर्घटना घडली तर केवढ्याला पडेल? 

नगरपरिषदेच्या कायद्यानुसार अग्निशमन यंत्रणा बसवणे अनिवार्य आहे. असे असताना देखील टू व्हीलर शोरूम मालकाने सदर शोरूम च्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा बसवली नसल्याचे रत्नागिरी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा दिसून आले आहे. नुकतेच त्यांनी सदर टू व्हीलर शोरूम ची पाहणी देखील केली आहे. त्यामुळे लवकरच सदर टू व्हीलर शोरूम च्य मालकावर अग्निशमन यंत्रणा न बसवल्यामुळे नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 

Comments