तंटामुक्त समिती अध्यक्षपदी श्री. ताबिश सोफी शिरगांवकर


कर्ला ग्रामपंचायत – तंटामुक्त समिती अध्यक्षपदी श्री. ताबिश सोफी शिरगांवकर यांची सर्वानुमते निवड

आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी पार पडलेल्या कर्ला गावच्या ग्रामसभेत, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. ताबिश सोफी शिरगांवकर यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते व एकमताने निवड करण्यात आली.

त्यांच्या निवडीमुळे कर्ला व परिसरात उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत नवे अध्यक्षांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.


Comments