उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या अनुपस्थितीमुळे जि.प. पडवे गटातील उद्या होणारा पक्षप्रवेश सोहळा आणि जाहीर मेळावा रद्द - महेश नाटेकर यांची स्पष्टॊकती
आबलोली
महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. उदयजी सामंत यांच्या अधिपत्याखाली उद्या दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी आबलोली येथे जिल्हा परिषद शिवसेना शिंदे पडवे गटाचा पक्ष प्रवेश सोहळा आणि जाहीर मेळावा आम्ही आयोजित केला होता परंतु मला उद्योग मंत्री उदयजी सामंत यांचा फोन आला आणि सदरचा मेळावा आपण पुढे घेऊन या असे त्यांनी मला सांगितले मी त्यांना म्हटले साहेब आपण पक्षप्रवेश सोहळा आणि जाहीर मेळावा याची ताकतीनिशी तयारी केलेली आहे तर हा मेळावा पुढे घेऊ नका अशी मी त्यांना विनंती केली परंतु यामागचे मुख्य कारण त्यांनी मला असे सांगितले की, महाराष्ट्र राज्याची उद्योग पॉलिसी हा भव्य दिव्य कार्यक्रम असल्याने या उद्योग पॉलिसी कार्यक्रमासाठी जे कोणी उद्योग व्यवसाय करणारे मंडळी आहेत ते संपूर्ण एकत्र येऊन या महाराष्ट्राची उद्योग पॉलिसी ठरते त्यामुळे मी उद्योग मंत्री असल्याने या कार्यक्रमाला हजर राहणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे महेशजी उद्या होणारा पडवे जिल्हा परिषद गटाचा पक्ष प्रवेश सोहळा आणि जाहीर मेळावा सभेचा कार्यक्रम तुम्ही पुढे ढकला तशी मी तुम्हाला तारीख व वेळ देईन तेव्हा आपण पक्षप्रवेश सोहळा व जाहीर मेळावा घेऊया अशी माहिती फोनवरून मला उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी दिली त्यामुळे उद्योगमंत्री, पालकमंत्री नाम. उदयजी सामंत यांच्या अनुपस्थितीमुळे जिल्हा परिषद पडवे गटातील उद्या दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी आबलोली येथे शिवसेना शिंदे पक्षाचा पक्षप्रवेश सोहळा आणि जाहीर मेळावा रद्द करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य महेश नाटेकर यांनी पत्रकारांना दिली
पत्रकारांशी बोलताना जि.प.चे माजी सदस्य महेश नाटेकर पुढे म्हणाले की, उद्याच्या पक्षप्रवेश सोहळ्याची आणि जाहीर मेळाव्याची पूर्व जय्यत तयारी केलेली होती. जवळजवळ 2000 हजाराचे वरती या मेळाव्याला सर्व मंडळी उपस्थित राहणार होती शेकडो कार्यकर्ते शेकडो म्हणण्यापेक्षा जी मंडळी उपस्थित राहणार होती ती मंडळी सर्व प्रवेश कर्तीच होती. नेमके प्रवेशकर्ते कोण असा प्रश्न विचारताच त्यामध्ये माझी सभापती अनेक शाखाप्रमुख, विद्यमान सरपंच, उपसरपंच असे अनेक कार्यकर्ते उद्योगमंत्री, पालकमंत्री उदयजी सामंत यांच्यावर विश्वास ठेवून ही मंडळी आपल्याबरोबर शिवसेना शिंदे पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.या पक्षप्रवेश सोहळ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील तर मंडळी असतीलच परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट,भाजपा लोकसुद्धा माझ्याबरोबर शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत हा पक्षप्रवेश सोहळा माझी अशी इच्छा होती की,याच महिन्यात घ्यावा परंतु शेवटी उद्योग मंत्री आहेत त्यांच्या विचाराने ते जी तारीख देतील त्या तारखेला आम्ही निश्चित योग्य वेळी तो पक्षप्रवेश सोहळा घेऊ पक्षप्रवेश सोहळा होणार हे गुहागरच्या विद्यमान आमदारांना धक्कादायक बाब होणार की, काय कसे काय असा प्रश्न विचारताच महेश नाटेकर पुढे म्हणाले की, कोणाला धक्का द्यायचा आणि कोणाला धक्का नाही द्यायचा हा विषय महत्त्वाचा नाही परंतु जी मंडळी, ग्राउंड लेव्हलला काम करतात आणि जी लोक घराघरात जाऊन काम करतात ह्या लोकांच्या पाठीमागे जनता ही उभी राहतेच हे मी याच्या आधी विद्यमान आमदार यांच्या विरोधात सुद्धा त्यावेळेला मी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून आणल्या होत्या या वेळेलाही मी शिवसेना शिंदे गटाचे काम करणार आहे उद्योग मंत्र्यांच्या, पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मी तुम्हाला ग्वाही देतो हा पडवे जिल्हा परिषद गट हा शिवसेना मय होईल. त्या वेळेलाही मी शिवसेना धनुष्यबाण हातात घेऊन होतो त्याच धनुष्यबाण चिन्हावर मी निवडणूक लढलो होतो आणि याही वेळेला मी शिवसेनेचे चिन्ह धनुष्य पाहून घेऊन आहे त्याच्यामुळे मला काही कुठची अडचण दिसत नाही असे स्पष्ट मत पत्रकारांशी बोलताना महेश नाटेकर यांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment